स्थायी समितीवर सदस्य वाढीसाठी भाजपच्या हालचाली

bjp shivsena
bjp shivsenaesakal

नाशिक : दीड वर्षांपूर्वी भाजपच्या (BJP) दोन जागा कमी झाल्याने त्या घटत्या संख्याबळाच्या आधारे स्थायी समितीमध्ये (standing committee) अतिरिक्त एक सदस्यत्व मिळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळदेखील दोन नगरसेविकांच्या (corporator) निधनामुळे घटल्याने त्याच नियमाचा आधार घेत आता भाजपने देखील स्थायी समितीमध्ये आणखी एक जागा वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. (BJP move increase membership on standing committee)

पुन्हा भाजपकडून दावा

२०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले. मात्र २०१९ मध्ये पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक चारमधील नगरसेविका शांता हिरे यांचे निधन झाले, तर नाशिक रोड विभागात प्रभाग २२ मध्य सरोज आहिरे यांनी राजीनामा दिल्याने पोट निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जागा मिळाली. २०१७ च्या तौलनिक संख्या बलानुसार भाजपचे ८. ६५, तर शिवसेनेचे ४. ५९ सदस्यत्वाचे गुणोत्तर प्रमाण होते. दोन जागा घटल्याने भाजपचे संख्याबळाचे गुणोत्तर प्रमाण ८. ४६ पर्यंत घटले, तर शिवसेनेचे गुणोत्तर प्रमाण ४.६४ इतके वाढले. त्यानुसार स्थायी समितीवर भाजपचे आठ, तर शिवसेनेचे चारऐवजी पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. एक सदस्य वाढण्यासाठी शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. आता शिवसेनेच्या स्थायी समितीच्या सदस्या सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाल्याने स्थायी समितीच्या एका जागेवर नियुक्ती केली होणार आहे. ती एक जागा तर घटली त्याव्यतिरिक्त सिडकोतील नगरसेविका कल्पना पांडे यांच्या निधनामुळे एक जागा कमी झाल्याने शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या एका जागेवर पुन्हा भाजपकडून दावा केला जाणार आहे.

bjp shivsena
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेवरून शिवसेनेचा पाचवा सदस्य नियुक्त झाला. रिक्त झालेल्या जागेवर नियमानुसार शिवसेनेचाच सदस्य नियुक्त होईल. भाजपचा सदस्य नियुक्त झाल्यास पुन्हा न्यायालयीन लढाई लढू. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका.

तौलनिक संख्याबळाचा आधार घेऊन शिवसेनेने एक अतिरिक्त सदस्याची मागणी केली होती. आता रिक्त जागा भरताना शिवसेनेने यापूर्वी घेतलेल्या भूमिकेवर कायम राहावे. - जगदीश पाटील, गटनेते, भाजप.

bjp shivsena
दिलासादायक! नाशिक शहरात कोरोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com