नाशिक- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपमध्ये सर्वांना प्रवेशाची दारे खुले असल्याचे वक्तव्य करत शिवसेना (उबाठा) मधून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढणाऱ्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या मार्गात निष्ठावान यांची नाराजी आली आहे.