Municipal Election
sakal
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या निवडणूक प्रमुखांमध्ये झालेला बदल हा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात भाजपच्या स्थानिक पातळीवरील गटबाजी समोर आली. निवडणूकप्रमुख पदावरून आमदार ॲड. राहुल ढिकले यांना बाजूला केले. त्यांना निवडणूक प्रमुख का केले? केले तर बाजूला का सारले याचे उत्तर पक्ष कार्यकर्ते शोधत आहेत. त्याचे उत्तर न मिळाल्यास काँग्रेससारखी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.