BJP News : शहराध्यक्ष बदलावरून भाजपमध्ये धुसफुस; पाटील, गिते, धात्रक यांच्या नावाची चर्चा

Dinkar Patil, Hemant Dhatrak. Ganesh Gite
Dinkar Patil, Hemant Dhatrak. Ganesh Giteesakal

नाशिक : भाजपच्या शहराध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेला वर्षे उलटत आले तरी चाल मिळत नसल्याने त्याचा परिणाम म्हणून पक्षांतर्गत धुसफुस वाढतं चालली आहे. दर महिना, दोन महिन्यांनी नावे समोर येतात, परंतु पुढे काहीच हालचाल होत नाही.

त्यामुळे संघटना पातळीवर नैराश्य निर्माण झाले आहे. सद्यःस्थितीत आता माजी सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते व नामकोचे चेअरमन हेमंत धात्रक यांची नावे आघाडीवर आहेत. (BJP News confusion in BJP over change of city president Patil Gite Dhatrak name discussion nashik news)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षांमध्ये शहर पातळीवर नवीन नेतृत्वाचा शोध घेतला जात आहे. प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर साधारण खालची फळी बदलली जाते. परंतु प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदलाला सुरवात केली नसल्याने दररोज नवीन नावे पुढे येत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पुर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या शहराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाले. परंतु संघटना पातळीवर आमदार व खासदारांना संघटनेची पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परिणामी ढिकले यांचे नाव मागे पडले. मनसेत असताना शहराध्यक्ष पदाचा अनुभव, कार्यकर्त्यांची भक्कम फळी या अनुषंगाने शहराध्यक्ष पदासाठी ढिकले यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. ढिकले यांच्यानंतर पक्षात मराठा व इतर मागासवर्गीय नेतृत्वाचा शोध घेतला जात आहे. त्यात सभागृहनेते दिनकर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते व हेमंत धात्रक यांचे नाव देखील शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे.

----------चौकट

पदासाठी फिल्डिंग

विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहराध्यक्ष पदासाठी नावे समोर येत आहेत. शहराध्यक्ष बदलला जात नसल्याने संघटना पातळीवर धुसफूस वाढली आहे. मध्यंतरीच्या काळात पंचवटीतूनचं शहराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावण्यात आली. परंतु पक्षातून विरोध वाढल्याने ते नावदेखील मागे पडले.

-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com