Nashik BJP News: शहर भाजप कार्यकारिणीत ‘परिवारवाद’! निवडणुकीच्या तोंडावर असंतोष

 BJP
BJPesakal
Updated on

Nashik BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या परिवार वादावर बोट ठेवत असताना नाशिक शहरात घोषित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत नेमके भारतीय जनता पक्षाकडून परिवार वादाला स्थान आले आहे.

भाजपच्या परिवार वादाच्या या भूमिकेमुळे नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांबरोबरच जे डावलले गेले, त्यांच्यातही असंतोष निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नाशिकचे प्रभारी व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या जाणार आहेत. (BJP party executive announced in Nashik city BJP given place to family members of leaders nashik political)

भाजपची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी नुकतीच जाहीर केली. शहर कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समावेशक, सोशल इंजिनिअरिंगचा मेळ साधने अपेक्षित होते.

परंतु, जाहीर कार्यकारिणीने पक्षासमोर फार चांगले वातावरण असेल, याची शाश्वती पुसट झाली आहे. कार्यकारिणी जाहीर करताना पक्षाची ध्येयधोरणे, नीतिमूल्ये गुंडाळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

कार्यकारिणीत थेट आठ नगरसेवकांना सामावून घेतले. वर्षानुवर्षे ज्यांच्या घरात सत्तेची पदे आहेत, त्यांच्या आप्तस्वकीयांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. कार्यकारिणीत भौगोलिक समतोल राखण्यातही अपयश आले आहे.

नाशिक रोड विभागातून १२ नगरसेवक भाजपसाठी निवडून दिले होते. असे असताना संघटनेच्या महत्त्वाच्या पदांवर स्थान मिळाले नाही. भाजपची ताकद संघटना आहे.

संघटनेत असंतोष निर्माण झाल्याने लोकसभेसह त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढताना प्रथम घरातील लढाईचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

परिवार वादावर शिक्कामोर्तब

शहर कार्यकारिणी जाहीर करताना परिवार वादावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या कन्या संध्या कुलकर्णी यांना उपाध्यक्ष, तर आमदार डॉ. राहुल आहेर व माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे दीर सुनील फरांदे यांना सरचिटणीसपद देण्यात आले. लक्ष्मण सावजी यांच्या नातेवाईक असलेल्या सुजाता जोशी तसेच (कै.) बंडोपंत जोशी यांचे पुत्र देवदत्त जोशी, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांचे पुत्र माजी नगरसेवक अजिंक्य साने यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 BJP
Nashik BJP News: भाजप मालेगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

दहा नगरसेवकांची घुसखोरी

संघटना व सत्तेतील पदे स्वतंत्र असावीत, असे भाजपचे धोरण आहे. शहराध्यक्षपदाची निवड करताना खासदार किंवा आमदार नसावा, ही अट टाकण्यात आली होती. असे असताना कार्यकारिणीत तब्बल दहा नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक कुणाल वाघ, सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, सुनील खोडे, बाजीराव भागवत, शरद मोरे, राकेश दोंदे या नगरसेवकांच्या तसेच धनंजय माने यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत असंतोष वाढला आहे.

फरांदे-सावजींचे वर्चस्व

पक्षाच्या कार्यकारिणीत मर्जीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची संघटनेच्या कार्यकारिणीवर छाप दिसून येते.

पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले व पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना समान संधी न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली आहे.

तारुण्याचे गणित बिघडले

पक्षाच्या शहर कार्यकारिणीला तरुण चेहरा द्यावा, अशा स्पष्ट सूचना आहेत.

त्या अनुषंगाने विद्यमान अध्यक्ष प्रशांत जाधव हे पन्नासच्या आत असले, तरी सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलेले सुनील केदार व नाना शिलेदार हे पन्नासच्या पुढील असल्याने पक्षाचे तारुण्याचे गणित बिघडल्याची खुमासदार चर्चा नवीन निवडीनंतर सुरू झाली आहे.

पदावनतीमुळे असंतोष

शहर कार्यकारिणीत शहराध्यक्ष पदानंतर सरचिटणीसपद महत्त्वाचे आहे. यापूर्वी पवन भगूरकर, जगन पाटील सरचिटणीस होते. त्यामुळे एक तर त्यांना मोठे पद देणे अपेक्षित होते.

तशी संधी नसेल तर अन्य पर्यायाचा विचार करणे गरजेचे होते. त्यांना सरचिटणीस पदावरून पदावनत करीत उपाध्यक्ष करण्यात आल्याने हेही असंतोषाचे एक कारण आहे.

 BJP
BJP-JDS Alliance : 'मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, लोकसभेसाठी भाजप-धजद युती अंतिम टप्प्यात'; ज्येष्ठ नेते येडियुराप्पांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com