सेवा ज्योती यात्रानिमित्त भाजपची भव्य बाईक रॅली येवल्यात प्रमुख मार्गांवरून रॅली,महापुरुषांना अभिवादन,कार्याचा लघुपट प्रदर्शित

सेवा ज्योती यात्रानिमित्त भाजपची भव्य बाईक रॅली येवल्यात प्रमुख मार्गांवरून रॅली,महापुरुषांना अभिवादन,कार्याचा लघुपट प्रदर्शित
Published on: 
YEO26B27059 येवला : सेवा ज्योती यात्रेनिमित्त रॅलीत सहभागी भाजपचे पदाधिकारी ----------------- सेवा ज्योती यात्रानिमित्त भाजपची बाईक रॅली येवल्यात प्रमुख मार्गांवरून रॅली, महापुरुषांना अभिवादन, कार्याचा लघुपट प्रदर्शित -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनिमित्त भाजपतर्फे देशभर आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा ज्योती यात्रा’ अंतर्गत येवल्यात भाजपतर्फे बाईक रॅली काढण्यात आली. पक्षाचे झेंडे हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. अहिल्याबाई होळकर घाट येथून रॅलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच टिळक मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाईक रॅली अंगणगाव, विंचूर चौफुली, इंद्रनील कॉर्नर, खांबेकर खुंट, जबेश्वर खुंट मार्गे येवला मर्चंट बँक हॉल येथे पोहोचली. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध कामांवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया म्हणाले,‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचविणे आणि सेवा, विकास व राष्ट्रनिर्माणाचा संदेश समाजापर्यंत नेणे, हा ‘सेवा ज्योती यात्रा’चा उद्देश आहे. येथे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. रॅलीत समदडिया, मयूर मेघराज, नाना लहरे, मनोज दिवटे, मिननाथ पवार, संतोष काटे, महेश देशमुख, राजेंद्र परदेशी, दत्ता सानप, कृष्णा कव्हात, संतोष काटे, बापूसाहेब गाडेकर, गणेश गायकवाड, बाळासाहेब कुऱ्हे, लक्ष्मण सुरासे, उपनगराध्यक्ष पुष्प गायकवाड, बंडू क्षीरसागर, छाया क्षीरसागर, सचिन साबळे, मनीषा चव्हाण, ज्योती कपूरे, विजय मुंडे, शुभम माहुलकर, प्रकाश आळणे, गणेश रोठे आदी सहभागी झाले. ----------------
Marathi News Esakal
www.esakal.com