shivsena bjp
shivsena bjpesakal

नाशिकमध्ये भाजप, शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद

नाशिक : महापालिका निवडणुकांना (muncipal corporation election) सात महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना पक्षांतर्गत खदखददेखील वाढीला लागली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत, तर शिवसेनेतील दुसरी फळी भविष्यात अडचणीची ठरू शकते. या भीतीने वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती पोचवून उगवते नेतृत्व जागेवर संपविण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात ही खदखद उफाळून बाहेर पडणार असल्याचे दिसून येत आहे. (BJP-ShivSena-disputes-in-Nashik-political-marathi-news)

भाजपमध्ये योग्य निरोप मिळत नाही

व्यवस्थापन व मार्केटिंगच्या बाबतीत भाजप हा पक्ष सध्या आघाडीवर आहे. आंदोलन, बैठका, वरिष्ठांचे निरोप, मंत्री, पदाधिकाऱ्यांचे दौरे, जयंती, पुण्यतिथी, पत्रकार परिषदांचे निरोप देताना प्रदेश पातळीवरून येतात. निरोप देण्याची सक्षम यंत्रणा भाजपकडे आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्व व्यवस्थापन केले जाते. प्रदेश पातळीवरून ठराविक पदाधिकाऱ्यांना निरोप आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर मंडळ पदाधिकाऱ्यांपर्यंत, तर शासकीय, प्रशासकीय यंत्रणेसंदर्भातील निर्णय नगरसेवक, ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत पोचविले जातात; परंतु गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे निवडणुका जवळ येत असताना काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांपर्यंत निरोप पोचत नसल्याने नाराजी आहे. मराठा मूक मोर्चात नगरसेवकांनी एकत्र पोचण्याचा असाच निर्णय काही नगरसेवकांना पोचला, तर काही नगरसेवकांना निरोप पोचला नाही. ज्यांना निरोप पोचला ते नगरसेवक वेळेत हजर झाले; परंतु निरोप येत नसल्याने काही नगरसेवकांनी वाट न पाहता थेट आंदोलनस्थळ गाठले. अनेक निर्णयांबाबत असेच होत असल्याने भाजपमध्ये नगरसेवकांचा एक गट कमालीचा नाराज असून, नाराजी वरिष्ठांपर्यंत पोचविण्यासाठी एकत्र आले आहेत.

शिवसेनेत उभरत्या नेतृत्वाची भीती

कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या शिवसेनेत नगरसेवकांना उभरत्या नेतृत्वाची भीती वाटत आहे. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या संघटनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी शिक्षण, महापालिका, जिल्हा परिषद, तसेच अन्य शासकीय विभागातील गैरप्रकार बाहेर काढत आहेत. राज्यात सत्ता असल्याने मंत्र्यांकडे तक्रार करून विविध प्रकारच्या चौकशीची मागणी करत आहेत. त्यातून त्या पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व सिद्ध होत असून, जनमानसात त्यांची प्रतिमा उंचावत आहे; परंतु भविष्यात असे लोक निवडून आल्यास त्रासदायक ठरतील, अशी भीती विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संपर्क नेत्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये संबंधितांबद्दल तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. दुसऱ्या फळीतील पदाधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असून, त्यांच्याकडून पक्षाची प्रतिमा मलिन केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. यातून दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून, निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत कटकटींना सामोरे जावे लागत असेल तर निवडणूक लढवावी का, अन्य पक्षाचा रस्ता धरावा, अशी चर्चा सुरू आहे.

shivsena bjp
सामान्य नागरिकांनादेखील घरपट्टी माफीची अपेक्षा
shivsena bjp
जिल्ह्यात मराठी शाळांना मिळतेय पसंती; पटसंख्येत दुपटीने वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com