नाशिक: राज्यभरात विरोधी पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्त्यांचा ओघ वाढतो आहे. त्यामुळे आता पक्षात जागा हाउसफुल्ल झाली. सुनील बागूल यांच्यासाठी भाजपचा पक्षप्रवेश हा शेवटचा असून, त्यांनी भविष्यात अन्य पर्यायांचा विचार करू नये, असा सूचक इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी भाजपची दारे बंद असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षप्रवेश दिला जाणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.