आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद उभी करणार! येवल्यात भाजप-भाजयुमोचा संयुक्त स्नेहमेळावा;

आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद उभी करणार! येवल्यात भाजप-भाजयुमोचा संयुक्त स्नेहमेळावा;
Published on: 
पान-१ ॲंकर YEO26B27523 येवला : भाजपच्या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते. ------------- आगामी स्थानिक निवडणुकांत तरूण, नव्या नेतृत्वाला संधी --------- येवल्यातील भाजपच्या मेळ्यात निर्धार ः पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका, संघटनात्मक ताकद उभारणार ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १४ : दिवाळीच्या स्नेहपर्वाचे औचित्य साधत भाजप व भाजयुमोतर्फे येथे शनिवारी (ता.१४) झालेल्या संयुक्त स्नेहमेळाव्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणीला गती देण्याचे आवाहन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका सक्षमपणे लढण्याचा तसेच नव्या आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार करण्यात आला. ------------ भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद, समन्वय आणि संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या पुढाकारातून वर्मा पॅलेस येथे स्नेहमेळावा झाला. जिल्हाध्यक्ष यतीन कदम प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यात ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, नानासाहेब लहरे, रमेश भावसार, ॲड. शैलेश भावसार, राजेंद्र परदेशी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. गणेश दोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या अडचणी मांडतानाच शहर व परिसरातील जनहिताचे प्रश्न उपस्थित केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू असून येवला हे पूर्वीपासून संघटनात्मक आणि वैचारिकदृष्ट्या भाजपला अनुकूल असलेले गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने उभी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांना सामोरे जाताना ग्रामीण भागातील तरुण, निष्ठावान कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही विश्वास व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचे समीर समदडिया यांनी सांगितले. श्री. समदडिया यांनी प्रास्ताविक केले. दत्ता सानप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नानासाहेब लहरे यांनी आभार मानले. उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, नगरसेविका छाया क्षीरसागर, लक्ष्मी साबळे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कुशारे, धीरज परदेशी, मयूर कायस्थ, संतोष नागपुरे, संतोष केंद्रे, बापूसाहेब गाडेकर, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. गोविंदराव भोरकडे, संजय कुक्कर, संजय परदेशी, कृष्णा कव्हात, बाळासाहेब कुऱ्हे, मनीषा चव्हाण, ज्योती कपुरे, रत्ना गवळी, अनुराधा भायभंग आदी उपस्थित होते. ---------------- कोट केंद्र व राज्यात भाजप जनहिताची कामे करत आहे. येवल्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधीची कामे सुरू आहेत. शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावून संघटन वाढविण्याचा निर्धार मेळाव्यात झाला. - समीर समदाडिया, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.