भाजयुवा मोर्चाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
लोकगायिका मैथिली ठाकूर आणि शगुन परिहार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांना जबाबदारी
नवी दिल्ली, ता.२० : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (भाजयुवा मोर्चा) नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, यात विविध राज्यांतील तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष आणि वडोदराचे खासदार हेमंत जोशी यांनी मंगळवारी (ता.२०) ही नवी यादी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या निर्देशानुसार हे नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत.
या नवीन कार्यकारिणीत जम्मू-काश्मीरच्या आचारसंहिता आणि राजकारणात चर्चेत राहिलेल्या आमदारांसह विविध क्षेत्रांतील प्रभावी तरुण नेत्यांना स्थान मिळाले आहे.
प्रमुख नियुक्त्या
राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष (७ जण): शगुन परिहार (आमदार, जम्मू-काश्मीर), सौमेन करफा (आमदार, पश्चिम बंगाल), निखिल मणी तिवारी (उत्तर प्रदेश), अरविंद दमाणी (नागालँड), मालोथ कोमाली नाईक (तेलंगणा), राजेंद्र सिंह (बिहार) आणि भूपेंद्र नाग (छत्तीसगड).
राष्ट्रीय सरचिटणीस (३ जण): अर्पिता अपराजिता बाजेना (ओडिशा), हर्षवर्धन सिंह (उत्तर प्रदेश) आणि मिट्टा वंशी कृष्णा (आंध्र प्रदेश).
राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य : बिहारच्या लोकप्रिय लोकगायिका आणि आमदार मैथिली ठाकूर यांच्यासह एकूण ३४ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.
इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या:
राष्ट्रीय सचिव : विश्वजित खोऊंड (आसाम), आशिष झाला (मध्य प्रदेश), सायली रघुनाथ कुलकर्णी (महाराष्ट्र), हिमांशू शर्मा (राजस्थान), सरदार अरमानजोत ब्रार (पंजाब), अमन यादव (झारखंड) आणि राहूल झा (बिहार).
कोषाध्यक्ष : विनीत वत्स त्यागी (राष्ट्रीय कोषाध्यक्ष, उत्तर प्रदेश) आणि देवव्रत सिंह राजावत (राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष, राजस्थान).
माध्यम व सोशल मीडिया विभाग : हिमांशू यादव (राष्ट्रीय मीडिया प्रमुख, बिहार), तर दिल्लीच्या शिवानी सिंह व विशू बसोया आणि हिमाचल प्रदेशच्या अतुल ठाकूर यांच्याकडे सह-प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अपूर्व सिंह (सोशल मीडिया प्रमुख, दिल्ली) आणि मानवेंद्र चौहान (सह-प्रमुख, बिहार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्यांद्वारे देशभरातील संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि तरुण नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर वाव देण्याचा पक्षाचा उद्देश स्पष्ट होतो.