खामखेडा- देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, विठेवाडी, भऊर यांसह कळवण तालुक्यातील पिळकोससह पूर्वपट्ट्यातील जुनी बेज, नवी बेज, बगडू, भादवण, विसापूर, बिजोरे, गांगवण, चाचेरसह परिसरात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याचा अंदाज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.