Nashik News : जिल्ह्यातील आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

Pimpalner: Superintendent of Police Sanjay Barkund inspecting the security on the Maharashtra-Gujarat border
Pimpalner: Superintendent of Police Sanjay Barkund inspecting the security on the Maharashtra-Gujarat borderesakal

धुळे : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील चारही आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी केली आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वतः पिंपळनेर पोलिस हद्दीतील एका नाक्यावर जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी तपासणी मोहिमेत दारू, गांजा, गावठी कट्टाही जप्त केला आहे.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातला जोडणाऱ्या जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी करण्यात येत आहे. गुजरातमधील ३९ संशयित जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस सतर्क झाले आहे. (Blockade on inter state borders in district Investigation in background of elections in Gujarat for detained Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Pimpalner: Superintendent of Police Sanjay Barkund inspecting the security on the Maharashtra-Gujarat border
Nashik Crime News : मालेगावात तरुणाचा खून; संशयिताला अटक

जिल्हा पोलिसांनी गुजरातमधील चार वॉन्टेड आरोपींना ताब्यातही घेतले आहे. तपासणी मोहिमेत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीची दारू, गांजा, गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गुजरातला जोडणाऱ्या पिंपळनेर (ता. साक्री) लगतच्या ओटाबारी, झाकराबारी व मोहळगाव या तीन तसेच बिजासन घाट (ता. शिरपूर) या सीमांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

या भागातून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुजरामधील मतदारांना भुलविण्यासाठी सीमांवरून दारू, मादक पदार्थ, अवैध शस्त्र तसेच रोकड ने-आण होऊ शकते अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस सीमांवर चोवीस तास नजर ठेवून आहेत. स्वतः पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी शनिवारी (ता.२६) पिंपळनेरच्या सीमा नाक्यावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी आत्तापर्यंत १६३ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जिल्हा पोलिसांकडून वाहनांची तपासणीसह आनुषंगिक कार्यवाही करण्यात येत आहे. या दैनंदिन कार्यवाहीची माहिती वरिष्ठांनाही देण्यात येत आहे.

Pimpalner: Superintendent of Police Sanjay Barkund inspecting the security on the Maharashtra-Gujarat border
Nashik News : ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com