टुडे पान २ साठी...अवतीभवती

टुडे पान २ साठी...अवतीभवती
Published on: 
अवतीभवती -- धुळ्यात आज रक्तदान शिबिर धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी (ता. १७) युवासेना धुळे जिल्हा यांच्या वतीने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या विचारप्रेरणेने आणि सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविला जात आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजोपयोगी कार्यात आपले योगदान द्यावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शिबिर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी अकराला होईल. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन युवसेनेतर्फे करण्यात आले. -- शहरात १०० टन अतिरिक्त कचरा गोळा धुळे : फटाक्यांची आतषबाजी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात साचलेला तब्बल १०० टन अतिरिक्त कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबवून संकलित केला आहे. सणासुदीच्या सुटीमध्येही स्वच्छतेच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही. महापालिकेच्या नियमित वाहनांसह १० अतिरिक्त घंटागाड्या व ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा संपूर्ण कचरा उचलण्यात आला. दिवाळीच्या दिवसांत शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे चौक, बाजारपेठा आणि विविध प्रभागांमध्ये फटाक्यांचे अवशेष, कागद आणि प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. या समस्येची दखल घेत आरोग्य विभागाने कंत्राटदारांमार्फत वाहनांच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याचे निर्देश दिले. विशेषतः मुख्य बाजारपेठांमध्ये रात्रीच्या वेळी स्वतंत्र घंटागाडी तैनात करून व्यापारी व व्यावसायिकांकडून निर्माण होणारा कचरा नियमितपणे गोळा करण्यात आला. -- कलारत्न पुरस्काराने राजेंद्र गुरव सन्मानित धुळे : महात्मा जोतिबा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्रतर्फे दोंडाईचा येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे कलाशिक्षक राजेंद्र धनालाल गुरव यांना कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज राजे भूषणसिंह होळकर व सैनिक फेडरेशन भारतचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ॲड. शुभांगी शेरेकर, बंडोपंत महाराज ढाकणे, व्यंकटराव जाधव, प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य संजय चंदने उपस्थित होते. दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले श्री. गुरव चित्रकला, ढोलक वादन आणि संगीत क्षेत्रात परिचित आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, सी. एन. भाऊसाहेब, ललितसिंह गिरासे, आर. टी. गिरासे, डी. एन. जाधव, मुख्याध्यापक एस. डी. गिरासे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.