शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा

शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा
Published on: 
रक्ताचा तीव्र तुटवडा; रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण शिबिरांसाठी रक्‍तपेढ्या सरसावल्‍या, रक्तसंकलन घटले -- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवतो आहे. सण-उत्सवांचा काळ, बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये वाढलेले आजार आदी कारणांमुळे रक्‍त संकलनात मोठी घट झाली असल्‍याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. अशात शहरातील रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल अत्यवस्थ रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कसरत करावी लागते आहे. रक्‍ताचा तुटवडा निर्माण झालेला असतांना, या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि तरुणांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन रक्तपेढी चालकांनी केले आहे. शहरातील सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा सध्या अत्यंत कमी पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः ‘ओ पॉझिटिव्ह’, ‘ए पॉझिटिव्ह’ आणि सर्व प्रकारच्या ‘निगेटिव्ह’ रक्तगटांची मोठी कमतरता भासते आहे. अपघातग्रस्त रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त बालके, प्रसूती दरम्यान महिला आणि मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता असते. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित साठ्यामुळे रक्तपेढ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाइकांना एका रक्तपेढीकडून दुसऱ्या रक्तपेढीकडे धावपळ करावी लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसते आहे. --------चौकट यामुळे घटले संकलन... गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंगी, मलेरिया आणि व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आजारी पडल्यामुळे किंवा औषधोपचार सुरू असल्याने अनेक रक्तदाते रक्तदान करू शकत नाहीत. याशिवाय महाविद्यालयांना दिवाळीच्‍या सुट्ट्या सुरु आहे. सण-उत्‍सवांमुळे रक्तदान शिबिरे मंदावली आहेत. अशा परिस्‍थितीत रक्तपेढ्यांकडे रोज येणारी रक्ताची मागणी आणि प्रत्यक्षात होणारे संकलन यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. -----------चौकट जनजागृती मोहिमेचे नियोजन या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिकमधील विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळे, राजकीय पक्ष आणि औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे निरोगी नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता जवळच्या रक्तपेढीत जाऊन स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे, असे आवाहन जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, कार्यवाह शैलेश पंडित यांनी केले आहे. रक्तदान शिबिरासाठी ९०१११५६९७३, ७७७४०७७९०० या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासनानेही या परिस्थितीची दखल घेतली असून, विविध स्तरांवर जनजागृती मोहीम राबवण्याचे नियोजन सुरू केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.