रानमळ्यात बहरला पळस; नव्या केशरी पालवीने नवचैतन्य | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blossoming in the Igapuri forest  Revitalize

रानमळ्यात बहरला पळस; नव्या केशरी पालवीने नवचैतन्य | Nashik

इगतपुरी (जि. नाशिक) : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या डोंगररांगेत वनस्पतीशास्त्रप्रेमींच्या दृष्टीने दुर्मिळ अशी रानफुले बहरली आहेत. या मनमोहक दृश्यामुळे इगतपुरी व कसारा घाटाचा परिसर नटला आहे. तसेच रानमळ्यात पळस बहरल्यामुळे निसर्गात नव्या केशरी पालवीने नवचैतन्य निर्माण झाले आहे. येथील विविध रानफुले, वनस्पती व वनौषधी, झाडेझुडपे बघण्यासाठी व सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे अभ्यासक व हौशी पर्यटक (Tourist) हजेरी लावत आहेत.

महिनाभरापासून शिशिर ऋतूत (Winter) वृक्षवेली, झाडांनी जुनी पालवी टाकून दिल्याने निसर्गात उदासीनता मरगळ दिसून येत होती. जणू निसर्ग रुसला होता. अशा उदासीनतेच्या काळात निसर्गाचीच दुसऱ्या बाजूने माळरानात असलेले वृक्षराज पळस मात्र गर्द केशरी रंगाचा शालू नेसल्यागत बहरल्याने नवचैतन्य बहरलेले दिसून येत आहे.

हेही वाचा: जीवघेण्या प्रसंगानंतर मलायकाचा खुलासा; 'माझ्यासोबत घडला तो अपघात नाही तर..'

निसर्गाचे कार्य ऋतुचक्राप्रमाणे सुरूच असते. त्याचाच एक भाग माळरानात दिसून येत आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून वसंतोत्सवास प्रारंभ होतो. या काळात धूलिवंदन असते. या वेळी पळसाचा गर्द केशरी फुलांचा रंग तयार करून धूलिवंदन खेळले जाते. वृक्षदेखील एक प्रकारे मनुष्याला बंधूप्रेमाची शिकवणच देत असतो.

हेही वाचा: ST Strike : सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ होणार

फ्लेम ऑफ फॉरेस्ट

पळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. पत्रावळीसाठी याची पाने वापरतात. उत्तर भारतात या झाडाला वसंत ऋतूत गर्द केशरी फुले येतात, तर महाराष्ट्रात डिसेंबर-जानेवारीत फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंगासाठी वापर होत. कृत्रिम रासायनिक रंगामुळे याचा वापर बंद झाला. याच्या बिया कडू असतात. त्यास ‘पळसपापडी’ म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षयतृतीयेला (Akshay Tritiya) याचा पत्रावळींसाठी विदर्भात योग होतो. पळसाच्या झाडाला तीन पानांचा समूह असतो. यावरून ‘पळसाला पाने तीनच’ ही म्हण रुढ झाली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणतात. कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार असतो. संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते. पळस पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे

Web Title: Blossoming Natural Beauty In The Igatpuri Forest Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top