Sword attack attempt at Bodhlenagar petrol pump in Nashik : नाशिकमधील बोधलेनगर येथील धात्रक पेट्रोलपंपावर दुचाकीस्वार सुनील पगारे यांच्यावर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपी मदन लक्ष्मण सोमवंशी याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली.
नाशिक: बोधलेनगर येथील धात्रक पेट्रोलपंपावर गोंधळ घालणाऱ्याने एका दुचाकीस्वारावर तलवारीने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हेल्मेटमुळे ते थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.