esakal | तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला
sakal

बोलून बातमी शोधा

bodu found sinner

तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : घरापासून काही अंतरावर समृद्धी महामार्गाच्या (Maharashtra Samruddhi Mahamarg) संरक्षक भिंतीला लागून विहिरीजवळ तरूणाच्या चपला आढळल्या. त्यामुळे संशय आणखीनच बळावल्याने पोलीसांसमोर हे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आहे. ( body of young man found in well sinner)

गोंदे येथील घटना

गोंदे येथील गणपती मंदिराशेजारी वास्तव्य असलेला रमेश ऊर्फ आकाश शुक्रवारी (ता. ३०) रात्री पाऊस असल्याने घराच्या पडवीऐवजी घराबाहेर लावलेल्या ट्रकमध्ये झोपला होता. सकाळी भाऊ अमोल यास आकाश व दुचाकी दिसून न आल्याने त्याने शोधाशोध केली. घरापासून काही अंतरावर समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीला लागून दशरथ रंगनाथ तांबे यांच्या विहिरीजवळ त्याच्या चपला आढळल्या. संशय बळावल्याने विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता आकाशचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. रमेश ऊर्फ आकाश शांताराम आव्हाड (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे.दरम्यान, या प्रकरणी वावी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर यांनी अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांना कळविल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या.

हेही वाचा: भयाची चाहूल गडद; 24 तासात गावावर दु:खाचा डोंगर

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान...

आकाश आव्हाडच्या घराशेजारी गणपती मंदिरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास एक ट्रक आव्हाड यांच्या घरी आल्याचे आणि त्यानंतर स्वतः आकाश आपल्या दुचाकीवरून या ट्रकमागे गेल्याचे दिसून आले आहे. या ट्रकचा नंबर अस्पष्ट असल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान आहे. परिसरात असणाऱ्या फूड कंपनीतून निघालेल्या एका ट्रकशी या ट्रकचे वर्णन जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्ता लक्षात न आल्याने अशी वाहने अनेकदा वस्तीपर्यंत यायची. हा ट्रक त्यांपैकी होता की आणखी दुसरा यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

अज्ञात मारेकऱ्‍याविरुद्ध खुनाचा गुन्हा

हातपाय दोरीने बांधून तालुक्यातील गोंदे येथील २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक बाब शनिवारी (ता. १) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार वावी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( body of young man found in well sinner)

loading image
go to top