राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी खास बोहडा

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी खास बोहडा
Published on: 
पान-३ ॲंकर ----------- NSK26H34074 नाशिक : बोहाडा मुखवटे साकारताना शंकर दापट व कुटुंबीय. ----------------- राष्ट्रपतींच्या स्वागतास खास बोहाडा मुखवटे हरसूलच्या कलाकृतीला राष्ट्रपती भवनात मिळणार स्थान गौरव जोशी ः सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३०: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३०) सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रपतींचा आदिवासी परंपरेतील सुबक बोहाडा मुखवट्याने सन्मान करण्यात येणार आहे. प्रभु रामचंद्र व श्री भगवान शंकर यांची प्रतिकृती असलेले हे बोहाडा मुखवटे आहेत. हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील दुर्गम गावातील कलाकाराने साकारलेल्या या मुखवट्यांना नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात स्थान मिळणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पंचवटीमधील रामकुंड येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाने या पर्वाचा प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागतासाठी आदिवासी परंपरा असलेले खास बोहाडा मुखवटे साकारण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील एका दुर्गम आदिवासी गावातील कलाकाराने हे मुखवटे साकारले आहेत. --- दापट परिवाराची कला लुप्त होत चाललेल्या बोहाडा मुखवटे या कलेला आदिवासी विकास विभागाच्या ''शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा''ने दिलेल्या भक्कम पाठबळामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भाप्रसे) यांनी हरसूलच्या दलपतपूर या जंगलव्याप्त गावाला भेट दिली होती. त्याप्रसंगी पिढ्यानपिढ्या बोहाडा मुखवटे बनविणाऱ्या शंकर दापट आणि कुटुंबाने ही कला अक्षरशः थांबवली होती. पण बनसोड यांच्या पुढाकारातून दापट कुटुंबाला आर्थिक साहाय्य आणि आवश्यक प्रशिक्षण देत ही कला पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली. -------------- शबरी उत्पादनांची भेट सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंत्री व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शबरी उत्पादनांची भेट देण्यात येणार आहे. या उत्पादनांमध्ये प्रभू राम व श्री शंकर बोहाडा मुखवटा, साबण, महुआ मनुका, मध, रागी कुकिज, इंद्रायणी तादूळ, मोहाचे तेल, मोहाचे चॉकलेट, मोंगी भोगचा समावेश आहे. शंभर पाहुण्यांना ही भेट दिली जाणार आहे. ---------- कोट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ ध्वजारोहण निमंत्रणावेळी शबरी नॅचरल उत्पादने भेट स्वरूपात देण्यात आली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी आदिवासी परंपरेचे प्रतीक असलेले बोहाडा मुखवटे राष्ट्रपतींना भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. - लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.