Crime
sakal
घराच्या अंगणामध्ये खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. तारापूर पोलिसांत आईच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक अरुण भिसे यांनी शिताफीने या अपहरणाच्या गुन्ह्याचा शोध लावत मुलास केरळमधून शोधून आणले.