Nashik Crime News : ऑनलाईन विमानाचे तिकिट काढणे पडले महागात; सायबर पोलिसांमुळे परत आली रक्कम

police felicitation
police felicitationesakal

नाशिक : शहरातील एकाला दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून सर्च करून एका खासगी कंपनीमार्फत विमानाचे तिकिट बुक केले. तिकिट कन्फर्म होण्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग झाली.

तिकिट न मिळाल्याने त्यांनी नाशिक सायबर पोलीसात फसवणुकीची तक्रार दिली असता, पोलिसांनी तात्काळ संबंधित कंपनीकडे पाठपुरावा करून गेलेली सुमारे १० हजारांची रक्कम परत मिळवून दिली. (Booking flight tickets online fraud money recovered due to cyber police Nashik Crime News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

राजेश कुलकर्णी (रा. इंदिरानगर) यांना गेल्या २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीला जायचे होते. त्यासाठी त्यांनी विमानाचे तिकीट काढण्याकरिता गूगलवर वेवसाईट सर्च केली. त्यांना वाराफी ही ऑनलाईन तिकिट बुकिंग कंपनी असल्याचे समजताच, त्यांनी नाशिक ते दिल्ली विमान प्रवासाचे तिकिट त्या वेबसाईटवरून बूक करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यांनी तिकिटाचे पैसे ऑनलाइन भरलेले असतानाही त्यांचे तिकिट कन्फर्म झाले नाही. त्यामुळे त्यांनी वराफी कंपनीला वारंवार मेल करुन पैसे परत मागितले. परंतु पैसे परत आले नाहीत.

तसेच, त्यांनी संबंधित बँकेकडेही गेले असता, त्यांनी मदत न करता सायबर पोलीसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजून त्यांनी सोमवारी (ता. ३) नाशिक शहर सायबर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

police felicitation
Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; वकिलाला अटक

सायबरचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी अर्जाची पडताळणी करुन पोलीस नाईक संतोष गोसावी व महिला अंमलदार सरला गवळी यांना याप्रकरणी तपासाच्या सूचना केल्या. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अंमलदारांनी तपास करुन वाराफी कंपनीला या प्रकरणात तात्काळ मेल केला.

त्यानुसार कंपनीने तिकिटासाठी आकारलेले ९ हजार ८९९ रुपये पुन्हा कुलकर्णी यांच्या बँक खात्यात वर्ग केले. पैसे आल्याचे पाहून कुलकर्णी यांनी पुन्हा सायबर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक डॉ. कोल्हे यांचे आभार मानले.

police felicitation
Nashik Crime News: बसस्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट; महामार्गावर दीड लाख तर, ठक्कर बाजारला आयफोन चोरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com