Nashik News: सटाणा वळण रस्ता बायपासमुळे शहर सौदर्यीकरणाला बूस्ट!

आरमच्या दोन्ही बाजूला साबरमतीच्या धर्तीवर मिनी टुरिझम शक्य
Road Construction
Road Constructionesakal

सटाणा : सटाणा बायपास रस्ता शहर सुशोभीकरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ४० वर्षांपासून रखडलेला वळण रस्ता तर होईल आणि गुजरात राज्यातील साबरमती प्लॅन प्रमाणे आरम नदीच्या दोन्ही किनाऱ्या‍यालगत मनोरंजनाची केंद्रे तयार होऊन एक मिनी टुरिझम म्हणून हा वळण रस्ता सटाणा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा समजला जाईल. (Boost city beautification due to Satana turn road bypass Nashik News)

अहमदाबाद शहरातून जाणाऱ्या साबरमती नदी व धुळे शहरातून जाणाऱ्या पांझरा नदीचा विकास झाला तसा सटाणा शहराला वळसा घालून जाणाऱ्या आरम नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत गॅबियन पध्दतीच्या भिंती बांधून नदी प्रवाह सुरक्षित करावा.

मळगाव बंधाऱ्याजवळील पुलापासून दोन्ही किनाऱ्याने रस्ता होऊ शकतो. सुकेड नाल्यातील यात्रा पटांगणातील दुतर्फा अतिक्रमण काढून पुढे देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, महालक्ष्मी मंदिराच्या मागून, जुने दौलत थिएटर बिंद्रावन घसड, अमरधाम व आनंद लॉन्सजवळून आरम नदीच्या दोन्ही बाजूने नाशिक सटाणा रस्ताच्या पुलापर्यंत वळण रस्ता तयार होऊ शकतो.

पुढे राजमाता जिजाऊ उद्यानापासून आराई शिवारालगत, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व बाजूने मालेगाव रोडला रस्ता मिळाला तर सटाणा शहरातून जाणारी अवजड वाहतूक आपोआप वळेल.

शहरासह आराई, मोरेनगर, इंदिरानगर, मळगाव, मुंजवाड या सटाणा पालिका हद्दी लगतच्या गावासाठीही हा वळण रस्ता बूस्टर ठरणार आहे. यात मळगाव पांथा, अमरधाम तसेच राजमाता जिजाऊ उद्यान या तिन्ही ठिकाणी आरम नदीवर आजही मोठे फरशीपूल कार्यरत आहेत.

त्यात आराई शिवार, पाटस्थळ बागाईत परिसर, ब्रिंदावन घसड, आठवडे बाजार ओट्यांची रिकामी जागा, आरम नदी व सुकेड नाला संगम अशा चारपाच ठिकाणी फरशी पूल बांधण्यासाठी खर्च आहे.

तसे झाले तर आरम नदी पलीकडेही सटाणा शहराची हद्द वाढ होईल. सोबत जुन्या गावठाण परिसरास नवसंजीवनी मिळेल. मालेगाव रोड, नाशिक रोड, ताहाराबाद रोड यांनाही शहराबाहेरून जोडणारा लिंकरोड म्हणजे एक प्रकारे बायपासच तयार होईल.

Road Construction
Governor Ramesh Bais: आदिवासी तालुक्यांतील कुपोषण हा चितेंचा विषय : राज्यपाल रमेश बैस

अतिक्रमणांची कटकट थांबेल

शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार नाही. शासनाचे बायपाससाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणाचे कोट्यवधी रुपये वाचतील.

सटाणा शहराचे संपूर्ण मलजल नैसर्गिक उताराने आरम नदीप्रवाहात जाऊन होणारे जलप्रदूषण पूर्णपणे थांबवता येईल. नदी किनाऱ्याने नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांच्या खालून भूमिगत पाइपद्वारे हे सर्व मलजल थेट बागाईतीजवळ एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून हे नत्रयुक्त पाणी बाराही महिने पाटस्थळ बागाईत क्षेत्राला मिळेल.

पूल कम बंधारे फायदेशीरच

या आराखड्याप्रमाणे नव्याने होणाऱ्या चार ते पाच पुलांच्या डिझाईनमधे भूमिगत बंधाऱ्यांच्या समावेश केल्यास सटाणा शहर परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ होईल. पर्यावरण संरक्षणाबरोबर पर्यटकांसाठी बोटींग व पिकनिक पॉइंट तयार होऊन छोटे-मोठे

व्यवसाय सुरू होतील. आरम नदी किनारी जॉगिंग ट्रॅक होऊन चौपाटी सदृश व्यवसायांना चालना मिळेल.

देवमामलेदार यशंवतराव महाराज मंदिर, यशवंत व्यायाम शाळा, विश्वकर्मा मंदिर, गणेश मंदिर, रेणुकामाता मंदिर, शनैश्वर मंदिर, आसरामाता मंदिर, कालभैरव मंदिर, दत्तमंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव महाराज मंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर या सर्वांना प्रशस्त असा प्रवेश रस्ता मिळेल व सटाणा शहर वळण रस्त्याचा प्रश्नही सुटेल असे वाटते.

Road Construction
Nashik News: जनावरे विकू नका, आम्ही सांभाळतो! दुष्काळी परिस्थितीत निळगव्हाणच्या गोशाळेची साद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com