Nashik : बोराळेचा कांदा दुबईच्या बाजारात!

Export of onion
Export of onion esakal

साकोरा (जि. नाशिक) : राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर देशात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता बोराळे (ता. नांदगाव) येथील भुमिपुत्र बळीरामसिंग राजपूत यांनी आपल्या शेतातील कांदा (onion) थेट दुबई (Dubai) मार्केटला रवाना केला आहे. जिद्दी शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ मिळाले असून, परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. (Borale Village onion export in Dubai market Nashik News)

बोराळे गावचे रहिवासी भिलासाहेब राजपूत यांच्या अकरा एकर क्षेत्रात उन्हाळ कांदा लागवड केली होती. यावर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे व अवकाळी पावसापासून गिरणा शिवार वाचल्यामुळे एकरी २०० क्विंटल चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळाले. चाळीत साठवणुकीसाठी (Storage) ४५ ते ५५ एमएम सर्वसाधारण आकाराचा कांदा लागतो. तर निर्यातीसाठी ५५ ते ६० एमएम मोठ्या आकाराचा कांदा लागतो. त्यामुळे शेतातूनच मालाची प्रतवारी करीत असताना मोठा माल ५५ एमएम गोणीमध्ये व सर्वसाधारण आकाराचा कांदा चाळीमध्ये साठवला जातो. शेतकरी भिलासाहेब राजपूत यांचा पुतण्या बलरामसिंग राजपूत आयात- निर्यात करीत असल्यामुळे दुबईच्या व्यापाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याचाच फायदा घेत शेतातून कांदा थेट दुबई मार्केटला रवाना करण्यात आला.

Export of onion
लाच घेताना पोलीस हवालदार जाळयात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नांदगाव तालुक्यातील बलरामसिंग यांच्या अनुभवाचा फायदा घेत आपला चांगल्या प्रतीचा कांदा शेतातून थेट निर्यात केल्यास त्याचा नक्की फायदा होईल. या सर्व प्रक्रियेत साहेबराव सोळुंके, दादाभाऊ सोळुंके, भाचा सुवर्णसिंग जाधव यांची मदत मिळाल्याचे राजपूत यांनी सांगितले.

Export of onion
BCCI महिला T-20 क्रिकेट स्पर्धेत माया चमकली; महाराष्ट्राला उपविजेतेपद

"मी बोराळे गावचा शेतकरी भूमिपुत्र असून, उच्च शिक्षित आहे. माझ्याकडे शेतमाल आयात- निर्यातीचा परवाना आहे. यापूर्वी मी केळी दुसऱ्या देशात पाठवून चांगले उत्पन्न मिळवले. तसेच, परिसरातील माल खरेदी करून शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे कसे मिळतील, हेच माझे ध्येय आहे."

- बलरामसिंग राजपूत, बोराळे (ता. नांदगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com