National School Kho-Kho Tournament : महाराष्ट्राचे दोन्‍ही संघ उपांत्यफेरीत

National School Kho-Kho Tournament
National School Kho-Kho Tournamentesakal

National School Kho-Kho Tournament : विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडत असलेल्‍या १९ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धेत महाराष्ट्र संघाने साजेशी कामगिरी करताना क्रीडाप्रेमींना खूष केले आहे.

शुक्रवारी (ता. १५) बादफेरीत चमकदार कामगिरी करताना महाराष्ट्राचे दोन्‍ही संघ उपांत्यफेरीत दाखल झाले आहेत.(Both teams from Maharashtra in semi finals in kho kho nashik news)

आता मुलींचा संघ पश्‍चिम बंगालविरुद्ध तर मुलांचा संघ कर्नाटकविरुद्ध लढत देताना अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्याची अपेक्षा आहे. शनिवारी (ता. १६) उपांत्‍य, अंतिम फेरीचा सामना रंगेल.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे ही स्‍पर्धा खेळविली जाते आहे. स्‍पर्धेच्‍या चौथ्या दिवशी उपउपांत्यपूर्व सामने खेळविले गेले. महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी विजय मिळवत आपल्या अंतिम विजयाच्या दिशेने उपउपांत्य फेरीचा पहिला टप्पा आरामात पार केला.

मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे तेलंगणाला १८ - ०८ अशा दहा गुण आणि एक डाव राखून मोठा विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या विश्वजित कुसाळेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. त्‍याला गणेश बोरकर,जितेंद्र वसावे, रमेश वसावे, चेतन बिका यांनी मोलाची साथ दिली. मुलांच्या उपउपांत्य सामन्यांमध्ये केरळने दिल्लीला हरविले. तमिळनाडूने छत्तीसगडवर विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.

तिसऱ्या सामन्यात कर्नाटकने उत्तर प्रदेशचे आव्हान परतवून लावले. महाराष्ट्राने हरियाना संघावर एक डाव आणि नऊ गुणांनी मात करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यामध्ये जितेंद्र वसावे, गणेश बोरकर, अजय कश्यप यांनी चांगल्‍या खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या गटात उपउपांत्य सामन्यात महाराष्ट्राची गाठ पंजाब संघाविरुद्ध झाली. या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

National School Kho-Kho Tournament
National School Kho-Kho Tournament: उद्यापासून राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा; देशभरातील 1536 खेळाडूंचा सहभाग

पश्चिम बंगालने मध्य प्रदेशवर, पश्चिम बंगालने मध्य प्रदेशवर विजय मिळविला. स्पर्धेला नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम, गोगाबाबा नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष उमेश कोठुळे, संचालिका संगीता कोठुळे, रूपाली कोठुळे, वास्तू तथास्तु ग्रुप आणि साई एंटरप्राइजचे संचालक नीरेन देवकर आदींनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला.

शनिवारी (ता.१६) सकाळी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार असून दुपारी स्पर्धेचे अंतिम सामने खेळविले जातील अशी माहिती स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख प्रेमचंद चौधरी यांनी दिली. या स्पर्धा खो-खोसाठी असलेल्या अधिकृत मॅटच्या चार मैदानावर खेळविल्या जात आहेत.

मैदान व्यवस्था चोख राखण्यासाठी खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख, जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत. स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंच पार पाडत आहेत.

उपांत्‍य फेरीच्‍या लढती अशा-

मुलेः महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि केरळ विरुद्ध तमिळनाडू.

मुलीः महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल आणि केरळ विरुद्ध कर्नाटक.

National School Kho-Kho Tournament
National School Kho-Kho Tournament: महाराष्ट्राची घोडदौड सुरूच! मुले, मुली संघाचा बादफेरीत प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com