Nashik News: खडक माळेगाव धरणावर आढळले ‘ब्राह्मणी डक’!

A pair of Brahminy ducks found at Khadak Malegaon Dam.
A pair of Brahminy ducks found at Khadak Malegaon Dam.esakal

लासलगाव : येथील खडक माळेगाव धरणावर हिवाळ्याची चाहूल लागताच ‘ब्राह्मणी डक’च्या जोड्या दिसू लागल्या असून, पक्षी अभ्यासाक व पक्षी मित्रांना पर्वणी मिळाली आहे. (Brahmin Duck found at Khadak Malegaon Dam Nashik News)

निफाड तालुक्याचे प्रसिद्ध असलेले प्रतिभरतपूर म्हणून नांदूरमधमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात हिवाळ्यात परदेशी पाहुण्यांचे आगमन होते. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात खडक माळेगाव धरणावर पक्षीमित्र, अभ्यासकांना ‘ब्राह्मणी डक’च्या जोड्या बघावयास मिळाल्या.

ब्राह्मणी डकला ‘रूडी शेल डक’, असेही संबोधतात. या स्थलांतरित बदकांना मराठीत चक्रवाक, चकवा, सोनेरी बदक अशा अनेक नावाने संबोधतात.

आकाराने मोठ्या बदका एवढ्या असलेल्या बदकांना निसर्गाचे मनमोहक रंग बहाल केल्यामुळे ही बदकांची जोडी रुबाबदार वाटते. जोडीजोडीने ही बदके हिवाळ्यात अनेक किलोमीटरचा प्रवास करून भारत भ्रमंतीवर येतात.

वनस्पतींची कोवळी पाने, खोड, गोगलगायी, शिंपल्यातील मृदुकाय सूक्ष्मजीव, छोटी मासे, बेडकांची लहान पिल्ले यासह काठावरील चिखलातील कृमी, कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. दरवर्षी या बदकांच्या जोड्या एप्रिल ते जूनदरम्यान वीण घालण्यासाठी हिमालय व आसपासच्या नेपाळ, तिबेट व लडाख परिसरातील सरोवरात एकवटतात.

हिवाळ्यात ही बदके आपल्या पिल्लांवळासह भारत भ्रमंतीवर येतात व देशभर विखरले जातात. विशेष म्हणजे ‘प्रियाराधनेत’तरबेज पक्षी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. अनेक वेळा या पक्षांचा उल्लेख साहित्यातूनही झाला आहे.

A pair of Brahminy ducks found at Khadak Malegaon Dam.
‘12th Fail’ submitted for Oscars: '12वी फेल' ऑस्करच्या शर्यतीत सामिल! बॉक्स ऑफिसवर जमवलाय इतक्या कोटींचा गल्ला

या बदकांच्या जोडीचे विशेष म्हणजे एकदा जमलेली आयुष्यभराची जोडी एक निष्ठेने संगत निभावतात जोडीतील एकाच जरी मृत्यू झाला तर दुसरा साथीदार विराह वेदनेने मृत्यू पत्करतो या पक्षांचा उल्लेख ज्ञानेश्वरी ते केला गेला आहे.

या पक्षांबरोबर खडक माळेगावच्या धर्म परिसरात पानकावळा, टिबुकली, राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळा, चित्र बलाक, उघड्या चोचीचा बलाक, विविध रंगाचे सराटी, पांढऱ्या छातीची पानकोंबडी, मोठा खंड्या, चातक, पिंगळा, हळद्या, देव ससाणा आदी पक्षीही आढळत असल्याचे पक्ष मित्रांनी सांगितले.

"खडक माळेगाव धरणात पानवठ्यांवर सध्या ‘ब्राह्मणी डक’ पक्षांचा काही जोड्या दिसल्या आहेत. हिवाळी मोसमाला सुरवात झाल्यानंतर परदेशी व देशांतर्गत पक्षांचे थवे दाखल होतात. जलाशयात मुबलक अन्न व सुरक्षित वातावरणामुळे ब्राह्मणी डक येथे आढळले आहेत. पक्षी अभ्यासासाठी समाधानकारक चित्र आहे."-किशोर वडनेरे, पक्षी अभ्यासाक

"ही स्थलांतरित बदके आहेत. ‘चक्रवाक’ किंवा ‘ब्राह्मणी डक’ या नावाने परिचित आहेत. या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पक्षी अभ्यासकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद मिळतो. सकाळी व सायंकाळी धरणाच्या काठावरील चिखलात सध्या या जोड्यांबरोबर इतर पक्षीही बघावयास मिळतात."-प्रमोद महानुभाव, पक्षीमित्र, लासलगाव

A pair of Brahminy ducks found at Khadak Malegaon Dam.
Hardik Pandya : कोच आशिष नेहराची डोकेदुखी वाढली, हार्दिक पांड्यानंतर गुजरातचा पुढचा कर्णधार कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com