
Breaking News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने संतप्त समर्थक उतरले रस्त्यावर; पाहा PHOTOS

जय भवानी रोड परिसरात अनधिकृतरित्या बसविण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनपाने हटविल्याने तणाव निर्माण झाला आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जय भवानी रोड येथे दाखल झाला आहे.

या घटनेमुळे मोठ्याप्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मनपा प्रशासनाने अनधिकृतपणे बसविलेला हा पुतळा पोलिस बंदोबस्तात हटवला.


7 डिसेंबर 2022 रोजी उपनगर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर पुतळा बसविल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

शहरातील जय भवानी रोड परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा काढल्याचा निषेधार्थ सर्व समाज बांधवांना एकत्र जमविण्याचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.