कॅशिअरची हिंमत अन्‌ ग्रामस्थांचा प्रसंगावधान

कॅशिअरची हिंमत अन्‌ ग्रामस्थांचा प्रसंगावधान
Published on: 
NSK26H34187, NSK26H34193 भोकर : पाठलाग करताना ग्रामस्थ. दुसऱ्या छायाचित्रात दराेडेखाेरांनी फेकलेल्या बॅगेतील राेकड व साेन. --- रोखपालची हिंमत अन्‌ ग्रामस्थांचे प्रसंगावधान --- गावकीने उधळून लावला कोट्यवधीचा दरोडा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : स्टेट बँकेच्या भोकर शाखेत दरोडा टाकून कोट्यवधीचे सोने आणि रोकड घेऊन चार सशस्त्र दरोडखेार पसार झाले. मात्र, रोखपाल जयेश मराठे यांनी हिंमत दाखवत भोकर ते जळगाव रस्त्यावरील ग्रामस्थांना घटना सांगून मदत मागितली. गावकीही मदतीला धावून आली. एकाच वेळेस चार गावाच्या ग्रामस्थांनी जागोजागी रस्ता अडवून झालेला दरोडा उधळून लावला. भोकर स्टेट बँकेत दुपारी अडीचला पिस्तूलचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक जयेश राणे, रोखपाल रणजित मराठे यांना पिस्तूल लावून बँकेतील जवळपास १६ लाखांची रोकड आणि पाच बॅग भरतील इतक्या वजनाचे ग्राहकांनी गहाण ठेवलेले कोट्यवधीचे सोने घेऊन पेाबारा केला. दरोडेखोर ज्या मार्गाने पळाले, त्या मार्गातील सर्वच ग्रामस्थांचे मोबाईल क्रमांक रणजित मराठे यांना माहिती होते. तत्काळ त्यांनी गावेागावी भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली, तसेच पोलिसांनाही माहिती दिली. तर भोकरचे काही तरुण दुचाकीने दरोडेखोरांच्या मागावर गेले. चौकट सिनेस्टाईल थरार सुरुवातीला भोकर ग्रामस्थ, नंतर किनोदच्या तरुणांनी दरोडेखोरांच्या दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथूनही ते निसटले. नंतर रिधूर ग्रामस्थ आणि शेवटी डिकसाईच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॅली आडवी लावून मार्ग अडवत गाड्या अडवल्या. त्यापैकी एक दुचाकीस्वार धरणगावच्या दिशेने पसार झाला, तर दुसरा पकडला गेला. मार देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्या मागे बसलेल्याने पळून जात शेतशिवाराचा आसरा घेतला. त्याला रात्री गुन्हे शाखेने शोधून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.