Nashik Bribe Crime : मृत्यूच्या दाखल्यासाठी सहाशे रुपयांची लाच; पिंपळनेरचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribe crime
Bribe crimeesakal

लखमापूर (जि. नाशिक) : मृत्यूचा दाखला देण्यासाठी सहाशे रुपये लाच मागणारा पिंपळनारे (ता. दिंडोरी) येथील ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. (Bribe of six hundred rupees for death certificate Gramsevak of Pimpalner in custody of bribery Nashik Bribe Crime)

आशेवाडी येथील एका नागरिकाच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले होते. त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला बनवून देण्यासाठी तक्रारदाराकडे ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे यांनी सहाशे रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून मृत्यू प्रमाणपत्रासाठी सहाशे रुपये प्रत्यक्ष लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Bribe crime
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास २० वर्षांची सक्तमजुरी

लाचलुचपत विभागाचे मार्गदर्शक शर्मिष्ठा वालावलकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, अपर पोलिस अधीक्षक नरेंद्र पवार, सापळा अधिकारी मीरा आदराने, प्रवीण महाजन, अजय गरुड, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. लाचखोर ग्रामसेवक याच्यावर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Bribe crime
Crime News : परप्रांतातून नागपुरात शस्‍त्रविक्री?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com