Nashik Bribe Crime : निफाडच्या लाचखोर महिला नायब तहसीलदारासह एकाला रंगेहाथ अटक!

Bribe Crime
Bribe Crimeesakal

नाशिक : पिंपळगाव नजिकच्या शेतीचे बिनशेती करण्यासाठीच्या प्रकरणात ३५ हजारांची लाच स्वीकारताना निफाडच्या नायब तहसिलदार व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. कल्पना शशिकांत निकुंभ (५७) व कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे (३८) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. दरम्यान, नायब तहसिलदार निकुंभ यांना सेवानिवृत्तीसाठी अवघे पाच महिने राहिले होते. (Bribery woman Naib Tehsildar of Niphad arrested red handed for taking bribe Nashik Bribe Crime)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Bribe Crime
Maharashtra Politics : नाशिकमध्ये पुन्हा ठाकरे गटाला हादरा! राऊतांच्या निकटवर्तीयाची पक्षातून हकालपट्टी

तक्रारदारांच्या तक्रारीनुसार त्यांचे चुलत आजोबा व इतरांचे मौजे पिंपळगाव नजिक गटापैकी ८३०० चौ.मी. क्षेत्र बिनशेती करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी निफाड तहसिलमध्ये विनंती अर्ज दिला होता. याप्रकरणात कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते तहसिलदारांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात नायब तहसिलदार कल्पना निकुंभ यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, विभागाने सापळा रचला असता, लाचखोर नायब तहसिलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून संशयित कोतवाल अमोल कटारे याने प्रशासकीय इमारतीच्या पुरुष प्रसाधन गृहात लाचेची ३५ हजारांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, गायत्री जाधव, अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांनी केली.

Bribe Crime
Nashik News : शालिमार भागातील जाहिरात फलकांचे अतिक्रमण काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com