सुनील खैरनार : लखमापूर (ता. बागलाण)- ग्रामीण भागातील शेतकरी मुलांच्या विवाहाची समस्या किती बिकट झाली आहे याचा आणखी एक प्रत्यय येथील शेतकरी कुटुंबाला आला. विवाहासाठी वधू मिळत नसल्यामुळे अडचणीचा फायदा घेत प्रत्येक गावामध्ये लग्न जमविणारे एजंट तयार झालेले आहेत. यातून लाखोंची फसवणूक होत आहे.