Bharat Jodo Yatra : कमरेला पट्टा लावून नाशिकच्या वृंदा शेरे धावल्या ‘भारत जोडो’त

MP Rahul Gandhi signing the poster of Brinda Sheren of Nashik in the 'Bharat Jodo Yatra'
MP Rahul Gandhi signing the poster of Brinda Sheren of Nashik in the 'Bharat Jodo Yatra'esakal
Updated on

नाशिक : कमरेला पट्टा लावून कशा काय चालताय..? खासदार राहुल गांधींनी प्रश्‍न करताच, नाशिकच्या वृंदा शेरे (वय ५७) यांनी पाठीच्या कण्याचा त्रास होतोय, असं सांगितलं. त्यावर राहुल यांनी शस्त्रक्रिया अन् उपचार करून घेण्याचा आस्थेवाईकपणे सल्ला दिला. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये देगलूरपासून सहभागी झालेल्या वृंदाताईंना राहुल यांची पाच मिनिटांची ही भेट उत्साहवर्धक वाटली. (Brinda Shere of Nashik ran in Bharat Jodo Yatra with belt around her waist Nashik News)

MP Rahul Gandhi signing the poster of Brinda Sheren of Nashik in the 'Bharat Jodo Yatra'
YIN Arts Festival 2022 : ‘SAKAL’तर्फे उद्यापासून ‘यिन’ कला महोत्‍सव

वृंदाताई याबाबत म्हणाल्या, की माझे आजोबा बॅरिस्टर विनायक सदाशिव डोंगरे मुंबईत नाना चौकात राहायचे. नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला आताचे ‘डोंगरे वसतिगृह मैदान’ त्यांनी १९२० मध्ये दान दिले. देशाच्या स्वातंत्र्याचा विषय पुढे आला असताना, तुम्ही काय करत होता? असा प्रश्‍न विचारला जाईल. अशावेळी मी देशाच्या बाजूने उभी राहिली आणि माझा आवाज उंच केला, असे मला अभिमानाने सांगता येईल. शाळेत शिकत असताना स्वर्गीय इंदिरा गांधी नाशिकमध्ये आल्या असताना त्यांची भेट झाली होती.

त्या वेळचे फारसे आठवत नाही. पण दिवंगत राजीव गांधी नाशिकला आले असताना त्यांची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून मी त्यांना भेटले होते. ‘राहुल गांधी यांच्या पदयात्रेत दहा मिनिटे मी पळत होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे मला त्यांच्याजवळ जाता आले नाही. पोलिसांनी मला दोर धरून चालण्यास सांगितले. संयोजकांनी मला दोराच्या आतल्या भागात नेऊन राहुल यांची भेट घडवली. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत मी त्यात सहभागी होण्याचे ठरवले आहे’ असे वृंदाताई यांनी सांगितले.

MP Rahul Gandhi signing the poster of Brinda Sheren of Nashik in the 'Bharat Jodo Yatra'
Political Instability in State : राज्यात राजकीय अस्थिरता येणार!; ज्योतिषाचार्यांचे भाकीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com