चाळीसगाव येथे १७ ऑक्टोबर रोजी बौद्ध बांधवांचा मेळावा

चाळीसगाव येथे १७ ऑक्टोबर रोजी बौद्ध बांधवांचा मेळावा
Published on: 
बौद्ध बांधवांचा शनिवारी मेळावा चाळीसगावात बुद्धविहाराच्या निर्मितीला गती देण्यासाठी आयोजन सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १२ : तालुका बौद्ध पंचायत संलग्न बुद्धविहार निर्माण समितीतर्फे शनिवारी (ता. १७) सकाळी अकराला बौद्ध बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाजवळील सिंधी समाज हॉलमध्ये हा मेळावा होणार असून समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तालुका बौद्ध पंचायतचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे अध्यक्षस्थानी राहतील. मेळाव्याचे संयोजक तथा तालुका बुद्धविहार निर्माण समितीचे अध्यक्ष धर्मभूषण बागूल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तालुका बौद्ध पंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात भव्य बुद्धविहार उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कार्याला अधिक गती मिळावी आणि समाजबांधवांमध्ये बुद्धविहार निर्मितीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने बुद्धविहार निर्माण समितीची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार तालुक्यात दोन ते तीन मजली भव्य बुद्धविहार उभारण्याचा समितीचा मानस आहे. शिवाय शहरातील सुमारे शंभर वर्षांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या दिनबंधू आंबेडकर आश्रम या ऐतिहासिक संस्थेची जडणघडण आणि सध्या सुरू असलेल्या नवनिर्माणाच्या कामाची माहितीही मेळाव्यात देण्यात येणार आहे. शहरात समाजाच्या नावे असलेल्या काही शासकीय जमिनींच्या नोंदी उपलब्ध असून, या जमिनी सध्या पडिक अवस्थेत आहेत. या जमिनींची माहिती समाजातील अनेकांना नाही. त्यामुळे या जमिनींचा विकास करून तेथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाची नोंदणी करून संपर्क यंत्रणा आणि फोन डायरी तयार करण्याबाबतही विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन तालुका बुद्धविहार निर्माण समितीचे सचिव सुधाकर मोरे यांच्यासह बौद्ध पंचायतीच्या संचालकांनी केले आहे. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com