टुडे २ सेकंड मेन
---
NSK26H33573
जळगाव : बौद्ध समाज वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
-------
बौद्ध समाजातील ३४४ विवाहेच्छुकांचा परिचय
जळगावात वधू-वर मेळावा उत्साहात; महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनही उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : बौद्ध समाजातर्फे पाचवा वधू-वर परिचय मेळावा सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात उत्साहाच्या वातावरणात झाला. या मेळाव्यात ३४४ बौद्ध मुला- मुलींनी परिचय करून दिला. महाराष्ट्रातील विविध भागासह गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली येथूनही काही जणांनी हजेरी लावली. मेळाव्यात जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. समाजात ''सामूहिक विवाह'' ही संकल्पना रुजविणे, लग्नसमारंभातील अवास्तव खर्चाला फाटा देणे आपले कर्तव्य आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले, की विवाह जुळविताना फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगणे, उशिरा लग्न लावणे, पैशांची उधळपट्टी, विविध अटी- शर्ती ठेवणे, मानपानासाठी रुसणे, हे प्रकार बंद केले पाहिजे.
गीतकार सागर पवार यांनी गीतातून उपस्थितांची दाद मिळविली. उद्योजक भगवान उके यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, आदीबाबत मार्गदर्शन केले.
समाजसेविका शिला उके, मुख्य संयोजिका चंदा सुरवाडे, ॲड. आनंद कोचुरे, रमेश तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य संयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक तायडे यांनी आभार मानले. हरिभाऊ सुरवाडे, मिलिंद साबळे, स्वाती नन्नवरे, शारदा सुरवाडे यांनी सहकार्य केले.
------