...अन् रेडा पडला विहीरीत; रेड्याला बाहेर काढायला नागरिकांची शिकस्त | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

...अन् रेडा पडला विहीरीत; रेड्याला बाहेर काढायला नागरिकांची शिकस्त

नांदगाव (जि. नाशिक) : आज पर्यंत बिबट्या, हरणे, शेळ्या विहरीत पडल्याच्या घटना आपल्या ऐकिवात आहेत मात्र जर रेडा पडला तर? असे घडले आहे भालुर येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतात.

रेड्याला बाहेर काढावे कोणी?

लोहशिंगवे गावातील रेडा चरता चरता गवतात दडलेल्या विहिरीत अचानक पडला अन् अवघे गाव ते बघण्यासाठी विहिरीभोवती गोळा झाले. धप्पकन काही तरी पडल्याच्या आवाजाने निकम कुटुंब विहिरीकडे धावले. आत मध्ये डोकावल्यावर रेड्याचे २०० ते ३०० किलो वजनाचे धूड दिसले. डोके वर काढून पाण्यात पाय मारणारा व मदतीसाठी वर बघणारा रडा बघून सगळ्यांची मने हेलावली. जखमी अवस्थेतील रेडा असहाय्यपणे व भेदरलेल्या नजरेने काठावरच्या बघ्यांकडे बघत होता त्याला वर काढायची जबाबदारी कोणी घ्यायची! वनविभाग, ग्रामपंचायत की आपत्ती व्यवस्थापनाची यावर बराच खल झाला. अखेर ग्रामस्थांनी चारी बाजूंनी विहिरीत दोर सोडले, काही जणांनी खाली जाऊन रेडा दोराला बांधला. हुप्पा... हुय्या करून प्रयत्न केला. काठापर्यंत कसेबसे त्याला वर ओढले. पण त्याचे वजन माणसांच्या ताकदीपुढे भारी पडत होते. शेवटी जेसीबीच्या हुकात त्याला बांधलेले दोर अडकवले आणि चार तासानंतर रात्री दहा वाजता ते धूड बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले.

हेही वाचा: नाशिक : कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक; एक फरार तर 1 गजाआड

हेही वाचा: तुमचा मास्क अपग्रेड करण्याची वेळ आलीय का

Web Title: Buffalo Fallen Into The Well Was Pulled Out By The Citizens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikBuffaloes
go to top