Nashik News : झोडगे बसस्थानकाची इमारत बनलीय शोभेची वास्तू; उद्‍घाटनाची प्रतीक्षा कायम

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील मालेगाव ते धुळेदरम्यान सर्वात मोठ्या ४२ खेड्यांचे केंद्रबिंदू असलेले झोडगे गाव व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत.
Awaiting the inauguration of the bus station built on the basis of 'BOT'.
Awaiting the inauguration of the bus station built on the basis of 'BOT'.esakal

Nashik News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील मालेगाव ते धुळेदरम्यान सर्वात मोठ्या ४२ खेड्यांचे केंद्रबिंदू असलेले झोडगे गाव व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग लगत उभे राहून बसगाड्यांची प्रतीक्षा करावी लागते. (building of Zodge bus station has become an ornamental structure nashik news)

त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. इथे अनेक वर्षांपासून ‘बीओटी’ तत्त्वावर उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत प्रत्यक्षात वापर सुरु झाला नसल्याने ही इमारत धूळखात पडली आहे. इमारत शोभेची वास्तू बनली आहे.

बसस्थानक परिसरात मोकाट जनावरे व इतर वाहने पार्किंगच्या अड्डा बनला आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन नियमित शेकडो बसगाड्या इथून विविध राज्यांसह राज्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी धावतात.

महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर इथल्या प्रवाशांना सुरक्षित बसस्थानक उपलब्ध व्हावे यासाठी माजी सरपंच दीपक देसले यांनी प्रयत्न करुन महामार्गलगतच्या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर स्वर्गीय आबासाहेब लोटनराव देसले यांच्या नावाने बसस्थानक इमारत उभारली.

त्यामुळे लवकर झोडगेसह परीसरातील नागरिकांचा प्रवासाची सुरुवात सुखकर होईल ही अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा महामंडळाच्या दुर्लक्षामुळे धुळीस मिळाली आहे.महामार्ग चौपदरीमुळे वाहनांच्या वेग वाढला आहे. वाहनांची संख्या वाढल्याने, बसगाड्यांच्या प्रतिक्षेत प्रवाशांना महामार्गलगत तासन्-तास ताटकळत उभे राहावे लागते.

Awaiting the inauguration of the bus station built on the basis of 'BOT'.
Nashik News: जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचा जगाच्या कल्याणासाठी अवतार; उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज

जीव मुठीत घेऊन बसगाड्यांची वाट पाहावी लागते. चौपदरीकरणानंतर टोल कंपनीतर्फे प्रवाशांसाठी गावापासून दूर अंतरावर प्रतीक्षा शेड उभारले. मात्र, तेथे आजपर्यंत प्रवासी पोहोचले नाहीत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील झोडगे आणि परिसरातील नागरिकांना कुठेही प्रवास करण्यासाठी झोडगे येथून सुरवात करण्यासाठी सोईचे आहे.

पण बसस्थानक नसल्याने अनेक बसगाड्या महामार्गवरील गर्दी व वाहतूक कोंडी पाहून न थांबता, निघून जातात. त्यामुळे ऊनं-वारा, पावसाची तमा न बाळगता महामार्ग व सर्व्हिस रोडदरम्यानच्या रस्ता दुभाजकामध्ये जीव मुठीत धरून उभे राहतात.

हिदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर व स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील १९३ बसस्थानकांचे सौंदर्याकरण व सुशोभीकरण होणार असून, त्यासाठी ए.आय.डी.सी. आणि महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

राज्यात १८६ बसस्थानकांचा ‘बीओटी’ तत्वावर विकास करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. त्यामुळे झोडगेसह माळमाथा परिसरातील नागरिकांची आशा पल्लवित झाल्या आहेत.

''राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात मोठे असलेल्या झोडगे गावात प्रवाशांना महामार्गावर बसगाड्यांची वाट पाहावी लागते. इथे उभारण्यात आलेले बसस्थानक उद्‍घाटन कधी होईल, याची वाट पाहत आहे. मात्र, सुंदर व स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकाचे उद्‍घाटन होईल ही अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.''- गोरख देवरे, लखाणे

Awaiting the inauguration of the bus station built on the basis of 'BOT'.
Nashik News: दत्तगुरूंची झोळी मानवी दुःख स्वीकारण्यासाठी; गुरुमाउलींचे प्रतिपादन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com