धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 31645
--
बैलजोडीच्या दरात मोठी घसरण
-
दुष्काळाची धग : एक लाखावरून थेट ६० ते ७० हजारांवर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने त्याचा फटका पशुधन बाजाराला बसला आहे. चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने बैलजोड्या विकाव्या लागत आहेत. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावरांच्या बाजारात बैलजोड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्याने लाख रुपयाला खरेदी केलेली बैलजोडी आता ६० ते ७० हजारांपर्यंत विक्रीची वेळ आली आहे. यातून जिल्ह्याला दुष्काळाची धग जाणवू लागली आहे.
-
दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत झाला आहे. त्यामुळे चारा, पाणी टंचाईची समस्या हाताळावी लागणार आहे. परिणामी, पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. काही शेतकरी चारा-पाण्याचा खर्च भागविण्यासाठी बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
-
दुष्काळाचा परिणाम
धुळे बाजारात जळगावसह विविध भागांतील शेतकरी व व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, दुष्काळामुळे व्यवहारांवर परिणाम झाला आहे. पूर्वी लाख रुपयाला खरेदी केलेली बैलजोडी २० ते ३० हजारांचा नफा ठेऊन विकली जात होती. आता त्याच जोड्यांसाठी ४० ते ५० हजारांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
कवडीमोल भागात पशुधनाची विक्री
वरखेडे (ता. धुळे) येथील आनंद पगारे यांनी सांगितले, की चारा-पाण्याअभावी अनेक शेतकरी बैलजोड्या बाजारात आणत आहेत. योग्य दर मिळत नसल्याने त्यांना कवडीमोल भावात पशुधन विकावे लागत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे नवीन बैलजोडी खरेदी करण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. व्यापारी विश्वनाथ पाटील यांनी चार बैल बाजारात आणले होते. पैकी तीन बैल विक्री केले. लाख रुपयाला खरेदी केलेली जोडी आता ६० ते ७० हजारांत विक्री करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. चारा- पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकऱ्यांना पशुधन टिकवणे शक्य होईल. दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पाण्याचे टँकर सुरू करून चाऱ्याची उपलब्धता करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.