बंच केबलचा उपक्रमाने वीज तारांचे हटवले जाळे रथमार्ग दुरुस्तीच्या प्रतिक्षेत, वाहन पार्किंगच्या समस्या ऐरणीवर

बंच केबलचा  उपक्रमाने वीज तारांचे हटवले जाळे रथमार्ग दुरुस्तीच्या प्रतिक्षेत, वाहन पार्किंगच्या समस्या ऐरणीवर
Published on: 
वेध प्रभागाचा लोगो --------------- प्रभाग क्र. ८ (गंगावेस, लालचौक, नाशिकवेस, बैलबाजार मार्ग) 23365 ,23367 सिन्नर : गंगावेस भागात बंच केबलचा केलेला वापर. दुसऱ्या छायाचित्रात बैलबाजार मार्गावर वसलेला भाजीबाजार. अनधिकृत भाजीबाजार अन् दुकानांमुळे कोंडला श्‍वास नाशिकवेस भागात नित्याचीच वाहतूक कोंडी; बंच केबल''च्या प्रयोगाने वीज तारांच्या जाळ्यातून सुटका संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३ : नाशिक वेस ते लालचौक आणि गंगावेस ते नवीन पुलापर्यंत प्रभाग क्रमांक आठचा विस्तार पसरलेला आहे. शहरातील अत्यंत दाट लोकवस्ती, मुख्य बाजारपेठ आणि शहराचे मुख्य प्रवेशद्वार याच प्रभागात येते. मात्र, नाशिकवेस भागातील भाजीबाजार, रस्त्यांवर होणारे अतिक्रमणे आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या समस्यांमुळे येथील नागरिक व वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. दरम्यान, या प्रभागात राबविण्यात आलेला ''बंच केबल''चा आदर्श उपक्रम मात्र अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे. सांस्कृतिक महोत्सव, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीची सुरुवात याच प्रभागातून होते. मात्र, गंगावेस-लालचौक-भिकुसा कॉर्नर या प्रमुख रथमार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रथमार्गाचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशिकवेस भागात भरणारा भाजीबाजार वाहतुकीसाठी कायम अडथळा ठरत आहे. हा बाजार हटवण्याचे नगरपरिषदेने केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. थेट रस्त्यात लागणाऱ्या बाजारासह दुकानदारांकडून रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने चारचाकी वाहनांना ये-जा करणे कठीण होते. त्यातच नवीन पूल ते बाकळे बेकरीदरम्यान रस्त्यातच दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे; मात्र प्रशासनाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. ---------- बंच केबलचा पहिला प्रयोग या प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर वीज केबलचे जाळे पसरलेले आहे. रथासाठी हे जाळे अडचणीचे ठरत होते. प्रभागातील रथमार्गांवर ठिकठिकाणी हे जाळे हटविण्यात आले आहे. बंच केबलचा वापर केल्याने हे जाळे हटविण्यात आले. शहरात बंच केबलचा पहिला प्रयोग प्रभागात राबविण्यात आला. प्रभागात इतरही ठिकाणी वीज तारांचे जाळे आहे. ते हटविण्याचाही प्रयत्न सुरु आहे. --------- वीज समस्येपासून सुटका नळाला पाणी आले की वीज गायब अशी येथील अवस्था होती. मात्र प्रशासकीय काळापासून ते आत्तापर्यंत नगरसेवक हर्षद देशमुख यांनी ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवून ही समस्या सोडवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रभागासाठीचे नियोजीत प्रस्ताव गंगावेस ते भिकुसा कॉर्नरपर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण नाशिक वेस भागातील जिमला पुनरुज्जीवन महिलांसाठी स्वच्छतागृह नाशिक वेस ते भिकुसा कॉर्नर भूमिगत वीज व्यवस्था नगरसेवक काय म्हणतात 23369 पाणी योजनेचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. शहराला निश्चित वेळेला पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहे. हर्षद देशमुख ---------- नागरिक काय बोलतात 23371 गटारीवरील चेंबर तुटलेले आहेत. त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अजूनही चेंबर दुरुस्ती केली जात नाही. नागरिकांची कामे तातडीने व्हायला हवीत. तुकाराम हांडगे (रहिवासी, मुंगी गल्ली) ----------- (उद्याच्या अंकात : प्रभाग क्र. ९ : देशमुख मळा, आयटीआय, गोजरे मळा, हांडे मळा )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.