जुने नाशिक: घरफोडी गुन्ह्यात अल्पवयीन संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीत त्याच्याकडून २ लाख ५३ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अवघ्या ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला. ट्रॅक्टर हाऊस परिसरात गुरुवारी (ता.२१) दिवसाढवळ्या घराची भिंत फोडून घरफोडी करण्यात आली होती. रात्री उशिरा भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.