Latest Crime News | दोडी परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves broke the door frame of Kailas Sangle's new bungalow on the roadside at Dodi Khurd on Dapur Street.

Nashik Crime News : दोडी परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ!

नांदूरशिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यात प्रत्येक दिवशी कुठे ना कुठेतरी चोरी, घरफोडीची घटना घडत असूनही पोलिस मात्र चोरट्यांना आळा घालू शकलेले नाहीत. यामुळे चोरट्यांची पावत असून त्यांची हिंमत वाढली आहे. ग्रामीण भागातील या घटनांमुळे शेतकरी वर्गाने घराबाहेर पडावे की नाही अशी परिस्थिती आता वाडी वस्तीवर निर्माण झाली आहे. दोडीखुर्द येथे सोमवारी (ता.३१) सकाळी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. (burglary increased in Dodi area Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime News : बंद बंगल्यात घरफोडी; 44 तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोकडवर डल्ला

दोडी दापूर रस्त्यावर दोडी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला कैलास सांगळे यांची नवीनच इमारत झाली असून ते तेथे राहण्यास गेलेले नाहीत. मात्र चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने बंगल्याला लावलेल्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र या ठिकाणी चोरट्यांचे हाती काही लागले नाही. त्यामुळे चोर तेथून पसार झाले. त्यानंतर प्रकाश साबळे यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडून दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीची पर्स चोरून नेली.

या पर्समध्ये सव्वा तोळ्याचा नेकलेससह लहान मुलीचे दागिने आणि चार हजार रूपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. श्री. साबळे हे घराला कुलूप लावून कांदा लागवडीसाठी दुसऱ्या मळ्यात गेले होते, मुलगी त्याच्या घरी आली असता तिच्या हा प्रकार लक्षात आला. श्री. साबळे यांनी याबाबत ताबडतोब नांदूरशिंगोटे पोलिसांना कळविले. पोलिसांनी या भागात पाहणी केली असता चोरटे पसार झाले होते.

रात्रीच नव्हे तर भरदिवसासुद्धा चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चोऱ्यांमुळे पोलिस यंत्रणेसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे वाड्या वस्त्यांवरती शेतकरी वर्ग घाबरला आहे. यामुळे शेतीची कामे करावी की नाही की घरामध्येच थांबून राहावे अशी परिस्थिती झाली आहे. वरिष्ठ पातळीवरून उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: Tourism Trends of Nashikkar : राज्यात कोकण, देशात केरळ, तर परदेशात सिंगापूर