
Nashik : पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या-चोऱ्या
नाशिक : काही दिवसांपासून शहर पोलिस आयुक्तालय (Police Commissionerate) हद्दीत दिवसा राजरोसपणे चोऱ्या, घरफोड्या (Burglary) होत आहेत. पोलिसांकडून गुन्हे (Crime) दाखल करून घेतले जात आहेत. मात्र, गुन्ह्यांची उकल होताना दिसत नसल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही, अशी शंका जागरुक नागरिकांना येत आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांत घरफोड्या, चोऱ्यांमधून चोरट्यांनी तब्बल ५० लाखांच्या ऐवज चोरून नेला आहे. यामुळे पोलिसांची गस्तपथके करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Burglary theft under police protection nashik crime latest marathi news)
नाशिक शहरात १३ पोलिस ठाणे आहेत. शहर गुन्हे शाखेंतर्गत तीन गुन्हेशाखा आहेत. असे असताना दिवसा घरफोड्या, चोऱ्या केल्या जात आहेत. एवढेच नव्हे, तर रिक्षा व शहर बस प्रवासात संशयित महिलांकडून हातोहात महिलांचे दागदागिने व रोकड लंपास केली जात आहे. यामुळे पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या १५ दिवसांत १३ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात सुमारे १२ लाख ७५ हजार ६९४ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. सर्वाधिक घरफोड्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्या असून, या खालोखाल म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, नाशिक रोड, उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
दोन दिवसांपूर्वी तिडके कॉलनीत दिवसा सव्वापाच लाखांची घरफोडी झाली आहे. चोरीचे १२ गुुन्हे दाखल असून, यातही चोरट्यांनी ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यात सर्वाधिक पंचवटी, भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर हद्दीतही चोरीच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा: Crime Update : दुकान फोडून तांब्याच्या वस्तुंची चोरी
दोन घरफोड्या अन् एक चोरी
उपनगरला किचनची खिडकी तोडून ३६ हजारांचा ऐवज लंपास केला. वसंत देशमुख (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, १० ते १४ तारखेदरम्यान चोरट्याने त्यांच्या घराच्या किचनची खिडकी तोडून घरातून ३६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
यात भांडे, लॅपटॉप, टीव्ही, कॅमेरा असा सामान चोरीला गेला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. दुसरी घरफोडी इंदिरानगरमध्ये झाली. यात सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला.
अमन मौर्या (रा. वृंदावन कॉलनी, वडाळा शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंद रो-हाऊसच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून आत प्रवेश केला आणि २ लाख १९ हजारांचा सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेली.
यात ७५ हजारांचे सोन्याचा राणी हार, ३५ हजारांचे मंगळसूत्र, साडेनऊ हजारांचे कानातील दागिने व १ लाखाची रोकड, असा मुद्देमाल आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. इंदिानगरमध्ये सव्वादोन लाखांचे दागिने चोरीला गेले.
राजेंद्र येवला यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १६) मध्यरात्री घरात सर्व झोपलेले असताना, चोरट्याने फ्लॅटच्या उघड्या खिडकीतून कपाटाचा दरवाजा उघडून २ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. यात सोन्याची मोहनमाळ, सोन्याच्या बांगड्या, सोन्यांचे टोंगल, सोन्याची नथ, २० हजारांची रोकड, असा मुद्देमाल आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सावधगिरी बाळगा
*घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात
*बाहेरगावी जाताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी
*प्रवासात मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नका
*अपार्टमेंट, बंगला, कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
*शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी जागरुक नागरिकांची भूमिका बजवावी
"नागरिकांनी घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असे वारंवार आवाहन केले जाते. बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. पोलिसांकडून दिवस-रात्र गस्ती असते. सायंकाळी विशेष पेट्रोलिंग केली जाते. रात्री १२ ते पहाटे पाचपर्यंत गस्त असते. ठिकठिकाणी नाकाबंदी असते. गुन्हेशाखेकडून काही गुन्हेगारांना अटक केली असून, गुन्ह्यांची उकल झाली आहे."
-संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा
हेही वाचा: अरे बापरे बाप! बोअरवेल मधून उडाला 100 फुटावर पाण्याचा फवारा...
Web Title: Burglary Theft Under Police Protection Nashik Crime Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..