Nashik : कसारा घाटात बसच्या एक्सलेटरचे तुटले पेंडल! चालकाने दोरीच्या सहाय्याने बस नेली थेट नाशिक बसस्थानकात

The bus driver is driving while the conductor is holding the rope and trying to gain control.
The bus driver is driving while the conductor is holding the rope and trying to gain control.esakal

Nashik News : कल्याण डेपोची विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला जाणारी एस.टी. बस प्रवाशांना घेऊन कसारा घाटात भरधाव येत असतानाच अचानक मोठा आवाज आला असता, चालकाचे लक्ष गेले तेव्हा बसचे एक्सिलेटरचे पेंडलच तुटले असल्याचे लक्षात आले.

चालकाने मोठ्या शिताफीने बस थांबवून इगतपुरी आगाराला दूरध्वनीद्वारे कळविले तेव्हा आगारातील कारागीर आले. मात्र बसचे पेंडल दुरुस्त झालेच नाही, यात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

तेव्हा चालकाने दोरीच्या सहाय्याने गाडी कंट्रोल करून बस सुरू केली आणि थेट नाशिक आगार गाठले. (Bus accelerator pedal broken in Kasara Ghat driver took bus directly to Nashik bus stand with help of rope Nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The bus driver is driving while the conductor is holding the rope and trying to gain control.
Shivaji Chumbhale : हे तर राजकीय षडयंत्र, आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; माजी सभापती चूंभळे यांचे खंडन

प्रवाशांच्या सुविधांसाठी नाशिकमधून दुसरी बस उपलब्ध करून देण्यासाठी वाहक आणि चालक यांनी प्रयत्न केला. बिघाड झालेल्या बसची दुरवस्था पाहून एकाच्या हातात स्टिअरिंग, तर दुसऱ्याच्या हातात दोरीचा वापर करत चालकाने बस चालविली.

अंगावर शहारे आणणारा हा प्रवास बसमधील बसलेल्या प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने टळला. धावत्या बसमधील ही दृश्य प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत हा प्रवास किती थरारक ठरला ही कैफियत अमळनेरला गेल्यावर तेथील आगारप्रमुखांना सांगितली.

सर्वसामान्य प्रवाशांना एस.टी.चा प्रवास परवडणारा असल्याने व सुरक्षित असल्याची भावना मनात बाळगून अनेक प्रवासी भरवशाचा प्रवास असल्याचे मानतात. पण बिघाड असलेले वाहनाकडे शासन दुर्लक्ष करीत असेल तर प्रवाशांच्या जीविताचे काय, असा सवाल अनेकांनी व्यक्त केला.

The bus driver is driving while the conductor is holding the rope and trying to gain control.
Nashik News : महाविकास आघाडीच्या आमदाराला धमकी; चुंभळे पितापुत्रांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com