नाशिक- शहरातील बसस्थानकांत आलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले तर, बसस्थानकाच्या आवारात पार्क केलेल्या दोन दुचाक्याही चोरीला गेल्या आहेत. यामुळे शहरातील बसस्थानके प्रवाशांसाठी सुरक्षित नसल्याचेच यातून स्पष्ट होत असून, बसस्थानक हे चोरट्यांचे अड्डे बनले आहेत. पोलिसांचे दुर्लक्ष तर आहेच, परंतु बसस्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांना नामी संधी उपलब्ध होते आहे.