नाशिक- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे आयोजित सीए अंतिम परीक्षेसह सीए फाउंडेशन व सीए इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल रविवारी (ता.६) जाहीर झाले. या परीक्षेत नाशिकच्या नीरव हेमनानी याने नाशिकमधून पहिला तर देशातून ४७ वा क्रमांक पटकावला. इंटरमिजिएट परीक्षेत सोहम वाघने देशात २० वा, तर पार्श्व टाटीयाने ३१ वा क्रमांक पटकावला. फाउंडेशनमध्ये साक्षी चांडक हिच्यासह रुजल करवाने राष्ट्रीय क्रमवारीत १३ वा, सृष्टी चिंचोलेने १५ वा क्रमांक पटकावीत यश मिळविले आहे.