Nashik News : उंटाची पायपीट आता गुजरातच्या धरमपूरकडे! 2 दिवसांत होणार नाशिकहून स्थलांतर

camels
camelsesakal

Nashik News : नाशिकच्या पांझरपोळमध्ये विश्रांतीला असलेल्या उंटांची पायपीट येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहे. धरमपूर (गुजरात) येथील संस्थेने उंटाचे संगोपन करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १०८ उंटांचा ताबा या संस्थेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. (Camel transport towards Gujarats Dharampur Migration from Nashik to be done in 2 days Nashik News)

हे उंट राजस्थानमधून हैद्राबादला पाठविण्यात येत असल्याचा संशय असल्याने प्राणी संगोपन कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर नाशिकच्या यंत्रणेमार्फत आतापर्यंत १११ उंट नाशिकच्या हद्दीत आले.

त्यातील ३ उंटांचा मृत्यु झाल्याने सध्या पांझरपोळकडे साधारण १०८ उंटांचा ताबा आहे. अशातच मालेगावला आणखी ४३ उंट जिल्हा पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतले असून, नाशिकमधून एवढ्या सगळ्या उंटांची ने-आण कशासाठी, याचा शोध सुरु केला आहे.

ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरु असतानाच हे उंट संगोपनासाठी सध्या पांझरपोळच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यानंतर आता धरमपूर (गुजरात) येथील एका प्राणी संगोपन संस्थेने या उंटांच्या संगोपनाची तयारी दर्शविली असून, जिल्हा यंत्रणेशी पत्रव्यवहार करुन उंटाचा ताबा मिळावा अशी मागणी केली आहे.

ही संस्था उंटांच्या संगोपनाची कामे करते. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी संस्थेच्या हमीनुसार उंट त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. तसेच, सगळे उंट वाहनातून पोचविण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

camels
UGC-NET Exam : युजीसी-नेट अर्जाची 31 पर्यंत मुदत

गाडी नव्हे पायीच...

दरम्यान, प्रवास हा उंटाची दैनंदिनी असल्याने त्यांना एका जागेवर बसवून ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी ठीक नसल्याने त्यांना गाडीतून नव्हे, तर पायीच धरमपूरला नेले जाणार आहे.

उंटांच्या संगोपनाचा अनुभव असलेल्या धरमपूर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा यंत्रणेला तशी माहीती देत, उंट गुजरातला पायीच न्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकचे तहसिलदार आणि पशु वैद्यकिय आधिकाऱ्यांवर धरमपूर येथील संस्थेच्या संपर्कात राहून उंटाच्या स्थलांतराची जबाबदारी सोपविली आहे.

"प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या १०८ उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याची तयारी धरमपूर येथील संस्थेने दर्शविली आहे. त्यानुसार उंट संस्थेकडे सोपविले जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत उंटांचे पून्हा गुजरातला स्थलांतर सुरु होईल."

-गंगाथरण डी., जिल्हाधिकारी, नाशिक

camels
Dhule News : धुळे शहरातील 88 हजार मालमत्तांना सुधारित कर! हरकतींसाठी 21 दिवस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com