सातपूर- ‘कॅमेरून’मध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. नाशिकच्या उद्योजकांनी त्याचा लाभ घेऊन आपला उद्योग थाटावा व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन कॅमेरून इन्व्हेस्टमेंट अॅन्ड प्रमोशनचे डायरेक्टर जनरल बोमा डोनट्स यांनी ‘आयमा’ सभागृहात अंबड इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)बरोबर झालेल्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यावर केले. ‘आयमा’तर्फे अध्यक्ष ललित बूब यांनी या करारावर स्वाक्षरी केली.