बोरवठजवळ कार उलटली; तब्बल 13 प्रवाशी जखमी

car accident
car accidentesakal

पेठ (जि.नाशिक) : पेठकडून नाशिककडे जाणारी महाजे (ता. दिंडोरी) येथील क्रूझर (एमएच १५, सीटी ७८७०) कार बोरवठच्या पुढे रस्त्यालगत उलटली. यात क्रूझरमधील १३ प्रवासी जखमी झाले. (car-accident-near-Borwath-13-injured-nashik-marathi-news)

अपघातांची मालिका सुरूच

या राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातग्रस्त वाहनचालक जागेवर सोडून देत जखमीसह परस्पर उपचारासाठी निघून जात असल्याने अपघाताची नोंद होत नाही. यापूर्वी सावळघाटात वजनदार वस्तूंनी भरलेला अपघातग्रस्त हायवा ट्रक (जीजे १५, एटी ६२०९) रस्त्याच्या मध्यावर सोडून चालक फरारी झाला होता. त्यामुळे इतर वाहनांनी धोका पत्करून मार्गक्रमण केले. या अपघाताची नोंदही झालेली नाही.

car accident
जव्हार येथील बंधाऱ्यात तरुणाचा मृत्यू; परिसरात हळहळ

पेठ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार

कमलाकर चौधरी (वय ३३), रमेश दळवी (३८), यमुना दळवी (१८), सुमन दळवी (३०), चंदुलाल दळवी (२८), लक्ष्मण दळवी (६८), देवराम खांडवी (६९), मोहन खांडवी (६५), विठ्ठल गायकवाड (५२), एकनाथ दळवी (४८), एकनाथ दळवी (४२, सर्व रा. चिलारपाडा, ता. दिंडोरी), भगवान राऊत (३२, रा. कवडासर) व चालक अशोक डंबाळे (३६, रा. महाजे) जखमी झाले. त्यांच्यावर पेठ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या प्रकरणी अद्याप पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती

car accident
डोंगरगावच्या तरुणाच्या हाती गुजरातमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com