Nashik Crime: समाजकंटकाने कारला लावली आग | car set on fire by social activist Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In the middle of the night, the car of village panchayat member Amol Vilas Bagul was set on fire by a social activist.

Nashik Crime: समाजकंटकाने कारला लावली आग

Nashik Crime : मध्यरात्री समाजकंटकाकडून ग्रामपंचायत सदस्य अमोल विलास बागूल यांची कार पेटून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रथमेश ऊर्फ गुंग्या राजेंद्र केदारे यांनी टायर पेटून कारला आग लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (car set on fire by social activist Nashik Crime)

पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल विलास बागूल हे दिवसभराचे कांदा खरेदी-विक्रीचे काम पूर्ण करून रात्री अकराला पोलिस ठाण्यासमोरील हॉटेल रूचा येथे आले. व्यापारी भवनाच्या परिसरात स्विफ्ट कार पार्किंग केली.

रात्री एकच्या सुमारास पेटलेले टायरने बागूल यांच्या कारला आग लावली. कारने पेट घेतलेला असतानाच करण बनकर यांनी बागूल यांना भ्रमणध्वनी करून दुर्घटनेची माहिती दिली. बागूल यांनी तत्काळ पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.

कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, सीसीटीव्ही तपासले असता प्रथमेश ऊर्फ गुंग्या राजेंद्र केदारे यांनी ही कार पेटविल्याचे बागूल यांनी दिलेल्या पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अशोक पवार अधिक तपास करीत आहे.