
सैराट स्टाईल मारहाण प्रकरणी तब्बल 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
नाशिक : तळपाडा (ता. सुरगाणा) येथे सोमवारी (ता. ६) रात्री उशिरा झालेल्या सैराट (Sairat) स्टाईल हल्ल्याप्रकरणी (Attack) सुरगाणा पोलिसांत तब्बल २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (ता. ७) रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. (Case filed against 20 to 25 people in Sarat style assault case Nashik Crime News)
या हल्ल्यात जखमी झालेला युवक विजय भास्कर महाले (वय २५) यांनी गेल्या मार्चमध्ये न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. याच कारणावरून हा हल्ला झाल्याचे नमुद करत तक्रारीत म्हटले आहे की सोमवारी रात्री कुटुंबीयांसह घरी असताना बनपाडा (ता. सुरगाणा) येथील दिगंबर थविल, राहुल थविल, गणपत थविल, चंद्रकांत थविल, दिगंबर गवळी, तुषार कुंभार, देविदास थविल व अन्य २० ते २५ जणांनी तेथे येऊन कोर्ट मॅरेजची कुरापत काढून वाद घातला. तसेच, शिवीगाळ करून माझ्यासह पत्नी व वडीलांना कुऱ्हाडीचा दांडा, गज, काठी, तसेच लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
हेही वाचा: नाशिक : जिल्हा परिषदेत विभागातील CCTV कॅमेरे अलर्टवर!
तसेच, तुम्हा सर्वांना मारून टाकू, कुणालाही जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी केली. या वेळी भावजय, आई व ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून भांडण सोडविले. त्यानंतर हल्लेखोर हे घरातील पैसे व कपडे ठेवण्याची बॅग घेऊन पळून गेले. भाऊ दीपक याने सुरगाणा येथील सरकारी दवाखान्यात औषधोपचार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सुरगाणा पोलिस ठाण्यात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा: Nashik : स्वच्छता सर्वेक्षणाला सुरवात
Web Title: Case Filed Against 20 To 25 People In Sarat Style Assault Case Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..