पोलिसांची अजब तऱ्हा; ‘आपलं ते पोरगं, दुसऱ्याचं ते कार्टं’| Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Case filed against five circles for using Horns

पोलिसांची अजब तऱ्हा; ‘आपलं ते पोरगं, दुसऱ्याचं ते कार्टं’| Nashik

जुने नाशिक : ‘आपलं ते पोरगं, दुसऱ्याचं ते कार्ट’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील पोलिस चौक्यावरील भोंगे. रंगपंचमीदरम्यान (Rangpanchami) भोंग्यांचा वापर केल्यामुळे पाच मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून चौक्यावर भोंग्यांचा वापर होतोय. त्यांच्यावर मात्र कारवाई नाही. असे का? अशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी सर्वांचे प्रथम लक्ष जाते ते पोलिस प्रशासनाकडे. मात्र, त्यांच्याकडूनच अन्याय झाल्यावर दाद कोणाकडे मागावी, अशी स्थिती निर्माण होते. असाच काहीसा प्रसंग २२ मार्चला रंगोत्सव साजरा करणाऱ्या पाच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना अनुभवयास मिळाला. पोलिस आयुक्तालयाकडून रंगोत्सव साजरा करताना डीजेवर बंदी घालून पारंपरिक वाद्यांना परवानगी दिली होती. मेन रोड परिसरातील पाच मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला. त्यात भोंग्यांचा वापर झाला. भोंगा पारंपरिक वाद्यात मोडत नाही, असे कारण पुढे करून पोलिसांनी त्या पाचही मंडळांवर गुन्हा दाखल केला. यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह रंगप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: फेसबुक पोस्टमध्ये 'र' ऐवजी 'क' लिहिलं तर ही बदनामी कशी होणार? : SC

भोंग्यांचा वापर केल्याचे कारण देत कारवाई करण्यात आली. तेच भोंगे अनेक वर्षांपासून पोलिस चौक्यांवर दिसून येतात. वाहतुकीचे नियोजन, गर्दी टाळणे, कोरोना प्रतिबंधक नियम भोंग्यांच्या माध्यमातून सांगितले जातात. त्यामुळेही ध्वनिप्रदूषण होत आहे. नागरिकांना त्रास होत आहे. तरीही त्याबाबत कोणीही तक्रार केली नाही. पोलिसांनी मात्र केवळ एका दिवसासाठी भोंगे वापरल्याने मंडळांवर कारवाई केली. हा पोलिसांकडून केलेला अन्याय नाही तर मग काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आले. कारवाई सर्वांसाठी एकसारखीच असावी. त्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले. थोडक्यात म्हणजे पोलिसांनी ‘आपलं ते पोरगं दुसऱ्याचं ते कार्ट’, अशी वागणूक दिल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: IPL 2022: त्याची गुगली भल्याभल्यांना फसवणारी; कुलदीपसाठी गावसकरांची बॅटिंग

Web Title: Case Filed Against Five Circles For Using Horns Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HoliNashik