नाशिक : जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा

Jan Ashirwad Yatra Nashik
Jan Ashirwad Yatra NashikSakal

सिडको (जि. नाशिक) : पोलिसांची परवानगी नसतानाही ऐन कोरोना काळात केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या खासदार भारती पवार (Bharati Pawar) यांनी पाथर्डी फाटा ते उंटवाडी दरम्यान 'जन आशीर्वाद यात्रा' (Jan Ashirwad Yatra) काढल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी भाजप (BJP) शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जनआशीर्वाद यात्रेत नाशिक पश्चिमच्या आमदार, भाजप शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पती या महत्त्वाच्या लोकांनी मास्क परिधान न केल्याचे प्रामुख्याने दिसून आले होते. शासनाचे काटेकोर नियम पाळायचे. लग्नाच्या ठिकाणी मोजकी संख्या, स्मशानभूमीत कमी लोक, आंदोलन, मोर्चे, उपोषण, निवेदन देताना बोटावर मोजण्या इतके लोक हवेत, मनपा, शासन- प्रशासन, पोलिस यांच्या परवानग्या हव्या, तर दुसरीकडे मंत्री, आमदार, खासदारांच्या जनआशीर्वाद यात्रेला मात्र पोलिस संरक्षण.. हा कुठला न्याय म्हणायचा अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने नाशिकच्या नागरिकांमध्ये दिसून आली.

Jan Ashirwad Yatra Nashik
जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com