Nashik Crime News : गब्बर फाऊंडेशनचे अनधिकृत होर्डिंग हटवून गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hoarding

Nashik Crime News : गब्बर फाऊंडेशनचे अनधिकृत होर्डिंग हटवून गुन्हा दाखल

नाशिक : सातपूरच्या कार्बन नाका चौकात साई भंडाऱ्यानिमित्ताने अनधिकृतरीत्या लावण्यात आलेला गब्बर युवा फाउंडेशनचे होर्डिंग सातपूर पोलिसांनी हटवून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्तांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (Case filed for removing unauthorized hoarding of Gabbar Foundation Nashik Crime News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : इंदिरानगर बोगदा वाढीचे नेमके श्रेय कोणाचे? भाजप पाठोपाठ शिवसेनेची फलकबाजी!

त्यामुळे शहरात ठिकठिकाणी होर्डिंगबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गस्ती पथक कार्बन नाका परिसरात गस्तीवर असताना या ठिकाणी गब्बर युवा फाउंडेशनतर्फे आयोजक कमलेश पगारे, प्रफुल्ल साळवे, प्रतीक गांगुर्डे यांनी अनधिकृतरीत्या होर्डिंग्ज लावले होते. या होर्डिंग्जमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडल्याने सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी मिलिंद जाधव व पथकाच्या मदतीने सदरील अनधिकृत होर्डिंग पोलिस बंदोबस्तात हटविले. तसेच, सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Nashik News : गोदाघाटाला ‘तिसऱ्या’ डोळ्याची प्रतिक्षाच; सुरक्षेच्या दृष्टीने अहितकारक